Two Scheme Increase Money : मंडळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत सामाजिक न्याय, ऊर्जा, कामगार, आदिवासी विकास तसेच नगरविकास विभागाशी संबंधित निर्णय घेण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर , कांदाचाळ साठी मिळणार अनुदान , असा करा अर्ज
दिव्यांगांसाठी अर्थसहाय्यात वाढ
सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी या लाभार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये मिळत होते. मात्र आता ही मदत वाढवून २,५०० रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऊर्जा आणि कामगार विभागातील बदल
ऊर्जा विभागाने महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या योग्य वापराबाबत नवे धोरण आखले आहे. दुसरीकडे, कामगार विभागाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ आणि कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करून कामगारांसाठी नवे नियम निश्चित केले आहेत.
Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात खटाखट ₹२००० जमा होण्यास सुरुवात
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवा निर्णय
आदिवासी विकास विभागानेही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना यापुढे सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अधिक सुलभपणे उपलब्ध होईल.
मेट्रो आणि नागरी विकास प्रकल्पांना वेग
मंत्रिमंडळ बैठकीत नगरविकास विभागाने अनेक मोठे निर्णय जाहीर केले. मुंबईतील आणिक डेपो–वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका ११ प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पासाठी तब्बल २३,४८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गिका आणि नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनला मंजुरी मिळाली आहे.
पॅक हाऊस अनुदान योजना : पॅक हाउस उभारणीसाठी मिळणार ४०% अनुदान
पुणे मेट्रो मार्गावर दोन नवीन स्थानकांना – बालाजीनगर आणि बिबवेवाडी – मंजुरी देण्यात आली असून कात्रज मेट्रो स्थानकाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ६८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP) टप्पा ३, ३अ आणि ३ब साठीही राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभाग निश्चित केला आहे. पुणे ते लोणावळा लोकलसाठी तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यासाठीही खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन नागपूर प्रकल्प आणि बाह्य वळण रस्ता
नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र (International Business and Finance Centre) उभारण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी गोधणी आणि लाडगाव येथील सुमारे ६९२ हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. तसेच नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता (Outer Ring Road) आणि त्यालगत चार ट्रक व बस टर्मिनल्स विकसित केले जाणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे नवे संकुल
मंत्रिमंडळाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे उच्च न्यायालयाचे नवे संकुल उभारले जाणार असून या प्रकल्पासाठी तब्बल ३,७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ करून त्यांना दिलासा देण्यात आला, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सोपी करण्यात आली, तर मेट्रो, नागरी विकास आणि न्यायालयीन पायाभूत सुविधांना गती देण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अधिक माहितीसाठी https://sjsa.maharashtra.gov.in/en/scheme/shravan-bal-rajya-nivruttivetan-yojana/ या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
