E Shram Card Holder : मंडळी भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. रोजंदारीवर किंवा तात्पुरत्या कामावर जगणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे गरजू कामगारांना महिन्याला थोडाफार आर्थिक दिलासा मिळतो आणि भविष्यासाठीही पेन्शनची सोय होते.
गॅस सिलेंडर वर मिळणार ३०० रुपयांचे अनुदान , लवकर पहा सविस्तर माहिती
योजनेचे मुख्य फायदे
ई-श्रम कार्ड योजनेअंतर्गत पात्र कामगारांना दरमहा ₹१,००० रुपये भत्ता दिला जातो. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा ₹३,००० पेन्शन मिळते.
याशिवाय आरोग्य विमा, अपंगत्व सहाय्यता, अपघातातील मृत्यू किंवा गंभीर दुखापतीसाठी आर्थिक मदत आणि कुटुंबासाठी आधार अशा सुविधा देखील मिळतात.
SBI पशुपालन कर्ज योजना : 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार , असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
ही योजना केवळ असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. अर्जदाराचे वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान असावे आणि तो आयकर भरत नसावा. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड व आधारशी लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे.
पेमेंट स्टेटस घरबसल्या तपासण्याची प्रक्रिया
योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईल किंवा संगणकावरून काही मिनिटांत तपासता येते.
थेट कर्ज योजना : व्यवसाय करण्यासाठी लाभार्थ्यांना मिळणार १ लाख रुपयांचे कर्ज
1) https://eshram.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) Payment Status या पर्यायावर क्लिक करा.
3) आपला आधार क्रमांक किंवा ई-श्रम कार्ड क्रमांक टाका.
4) नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाका.
5) Submit केल्यानंतर तुमच्या पेमेंटची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
सरकारी योजनांमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे पेमेंट, पात्रता किंवा इतर तपशीलाबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी नेहमी अधिकृत पोर्टललाच भेट द्या.