पीएम किसान मानधन योजना : या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹३६,०००

PM Kisan Maandhan Yojana : शेतकरी मित्रांनो आपण जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वपूर्ण आणि फायद्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचं नाव आहे पंतप्रधान किसान मानधन पेन्शन योजना.

मानधन योजना शेतकऱ्यांची यादी पहा

ही योजना खास तुमच्यासारख्या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे, जे वर्षानुवर्षं शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या योजनेत सहभागी झाल्यास, तुम्हाला ६० वर्षांनंतर दरमहा ₹३,००० पेन्शन मिळू शकते. वर्षाला ही रक्कम ₹३६,००० इतकी होते. विशेष बाब म्हणजे, या योजनेसाठी तुम्हाला खिशातून वेगळा पैसा काढायची गरज नाही कारण आवश्यक ती रक्कम तुमच्या पीएम किसान योजनेतूनच वजा केली जाते.

पेन्शन कशी आणि कोणाला मिळेल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही १८ ते ४० वयोगटातील असायला हवा. या वयोगटातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी झालं, तर ६० वर्षांचे झाल्यावर दरमहा ₹३,००० पेन्शन मिळू लागेल.

राष्ट्रीय बायोगॅस योजना : बायोगॅस साठी मिळतंय इतके अनुदान , असा करा अर्ज

हे पेन्शन म्हणजे तुमच्या उतारवयात तुमचं एक स्वतःचं आर्थिक कवच असणार आहे. एकदा वयोमर्यादा पार केल्यावर, ही रक्कम दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

पैसे कोण भरेल?

योजनेतील सर्वात महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक भाग म्हणजे या योजनेसाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद पीएम किसान योजनेतूनच होते. म्हणजेच, दरवर्षी मिळणाऱ्या ₹६,००० च्या सन्मान निधीतूनच सरकार तुमचं पेन्शन योगदान वजा करतं.

डॉ. कमला सोहनी योजना : या महिलांना मिळणार आर्थिक मदत , असा करा अर्ज

उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याचं वय ४० वर्षे असेल, तर त्याचं मासिक योगदान सुमारे ₹२०० इतकं असेल. म्हणजे दरवर्षी ₹२,४०० त्याच्या सन्मान निधीतून कापले जातील आणि उरलेले ₹३,६०० त्याच्या बँक खात्यात जमा होतील. विशेष म्हणजे, यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून काहीही भरावे लागणार नाही.

नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सुलभ

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपं आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जाऊ शकता.
जातेवेळी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, जमीनधारकतेचे कागदपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असायला हवा.

CSC सेंटरवरील कर्मचारी तुमचं ऑनलाइन फॉर्म भरून देतील आणि मासिक योगदानासाठी बँकेतून ऑटो-डेबिट सुविधा देखील सक्रिय करतील. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक युनिक पेन्शन आयडी मिळेल. हा आयडी भविष्यात तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, म्हणून तो जपून ठेवा.

नमो दीदी ड्रोन योजना : महिलांना ड्रोन घेण्यासाठी मिळणार 8 लाख रुपये

पीएम किसानचा २० वा हप्ता जमा

२ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता जमा केला. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि अजूनही तुमच्या खात्यात हप्ता आलेला नसेल, तर pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचं नाव, नोंदणी स्थिती आणि इतर माहिती तपासा. आवश्यक असल्यास माहिती अद्ययावतही करा.

शेतकरी मित्रांनो, आजच्या काळात निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य असणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारने तुमच्यासाठी अशी योजना आणली आहे जिचा लाभ घेतल्यास तुमचं उतारवय अधिक सुखद, सुसह्य आणि सुरक्षित होऊ शकतं.

Leave a Comment