पीक विमा आला नाही ? लगेच करा हे काम … लवकर होणार पैसे जमा

Pik Vima Not Deposit : नमस्कार मित्रांनो शासनाकडून आपल्याला अनेक प्रकारच्या आर्थिक मदतीच्या योजना मिळतात जसं की अतिवृष्टी अनुदान, रेशनसाठी निधी, पीक विमा, किंवा इतर कोणतंही अनुदान. ही रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा केली जाते. पण बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो, की ही रक्कम कुठल्या खात्यात आली? आली की नाही? आणि हे कसं तपासायचं?

गांडूळखत निर्मिती योजना : शेतकऱ्यांना मिळतंय 75% अनुदान , असा करा अर्ज

हीच माहिती मी तुम्हाला आज खूप सोप्या भाषेत, पद्धतशीरपणे सांगणार आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का? आधी हे तपासा

सरकारी अनुदान तुमच्या खात्यात येण्यासाठी, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणं आवश्यक आहे. जर ते लिंक नसेल, तर पैसे जमा होणारच नाहीत.

हे तपासण्यासाठी तुम्ही NPCI (National Payments Corporation of India) चं पोर्टल वापरू शकता. तिथं जाऊन Consumer हा पर्याय निवडायचा आणि Bharat Aadhaar Seeding Status या पर्यायावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकून, मोबाईलवर आलेला OTP भरायचा.

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता: आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती!

या प्रक्रियेमुळे तुम्हाला लगेच कळेल की तुमचं आधार कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे.

आता पाहूया अनुदानाची रक्कम जमा झाली आहे का

जेव्हा आधार लिंक केलेलं बँक खाते समजतं, तेव्हा पुढची गोष्ट म्हणजे – त्या खात्यात पैसे जमा झाले का? हे तपासणं.

त्यासाठी तुम्ही PFMS (Public Financial Management System) या सरकारी पोर्टलचा उपयोग करू शकता. हे पोर्टल विशेषतः सरकारी पेमेंट तपासण्यासाठी आहे.

तिथं Know Your Payment हा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून, तुमचं बँकेचं नाव निवडायचं, आणि खात्याचा क्रमांक दोन वेळा टाकायचा. त्यानंतर एक साधा कॅप्चा कोड भरून, मोबाईलवर आलेला OTP द्या.

विद्यार्थ्यांना मिळतंय 86 प्रकाराचे शैक्षणिक कर्ज , असा करा लगेच अर्ज

यानंतर स्क्रीनवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल जसं की कोणत्या योजनेअंतर्गत किती रक्कम जमा झाली आहे, कोणत्या दिवशी झाली आहे, वगैरे.

या सगळ्या स्टेप्स अतिशय सोप्या आहेत आणि मोबाइलवरही करता येतात. त्यामुळे बँकेत जाण्याची गरज नाही. शासनाचे पैसे योग्य खात्यात जमा झाले की नाही, हे तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत तपासू शकता.

तुमच्यासाठी ही माहिती उपयोगी पडली का? अशीच माहिती हवी असल्यास जरूर कळवा, आणि इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment