Student Education Loan : मंडळी भारतातील अनेक विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे स्वप्न पाहतात. पण अनेकदा पैशांची अडचण येते आणि हवे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या मदतीने विद्यार्थी घरबसल्या सहजपणे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतात.
पोस्ट ऑफिस योजना : एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा 4.50 लाख
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी पोर्टल म्हणजे काय?
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी पोर्टल हे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या पोर्टलवर देशातील ३८ बँका जोडल्या गेल्या असून, त्या ८६ प्रकारचे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व कर्ज योजनांची माहिती मिळते आणि ऑनलाइन अर्ज करता येतो.
कोण अर्ज करू शकतो?
भारतीय नागरिक असलेला आणि बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या पोर्टलवरून कर्जासाठी अर्ज करू शकतो. तसेच मान्यताप्राप्त कॉलेज किंवा संस्थेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे. देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय शैक्षणिक कर्ज घेता येते.
पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी , जाणून घ्या सविस्तर माहिती
व्याजावर विशेष सवलत
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेत गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांचे कर्जावरील संपूर्ण व्याज सरकार भरते. वार्षिक उत्पन्न साडेचार ते आठ लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या कुटुंबांना तीन टक्के व्याज सवलत मिळते. तसेच सात लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावर पंचाहत्तर टक्के क्रेडिट गॅरंटी दिली जाते.
अर्ज करण्याची पद्धत
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास विद्यार्थी थेट pmvidyalaxmi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकतो. येथे सर्वप्रथम नोंदणी करावी लागते. नोंदणी करताना नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरावा लागतो. त्यानंतर ईमेलवर आलेल्या लिंकद्वारे खाते सक्रिय करता येते. खाते तयार झाल्यानंतर लॉगिन करून कॉमन एज्युकेशन लोन एप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मच्या माध्यमातून एकाच वेळी तीन बँकांना अर्ज करण्याची सुविधा मिळते. शेवटी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करता येतो.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना : या नागरिकांना मिळणार १५०० रुपये महिना
कोणती कागदपत्रे लागतात?
अर्ज करताना पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही ओळखपत्र आवश्यक असते. तहसीलदाराने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला (लागू असल्यास), निवास प्रमाणपत्र, मागील वर्गाची गुणपत्रिका, कॉलेजचे प्रवेशपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, फी पावती, तसेच बँक पासबुक किंवा रद्द केलेला चेक द्यावा लागतो. जर अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असेल, तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देखील जोडणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर योजना
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना ही अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे ज्यांना पैशांअभावी चांगले शिक्षण घेता येत नाही. या पोर्टलमुळे शैक्षणिक कर्ज मिळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक झाली आहे. आर्थिक ओझे कमी करण्यासाठी व्याजावर सवलत मिळत असल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे शक्य होते.
