Pig Farming Business Grant : मंडळी डुक्कर पालन उद्योगाच्या विकासासाठी आणि प्रगत जातींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक उप-मिशन राबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या उप-मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे डुक्कर पालन क्षेत्रात उद्योजकता वाढवणे तसेच प्रजननक्षम आणि उत्पादनक्षम जातींचे संवर्धन व सुधारणा करणे.
या कार्यक्रमाअंतर्गत डुक्कर पालन व्यवसायात गुंतलेल्या किंवा गुंतवू इच्छिणाऱ्या विविध गटांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक उद्योजकांसोबतच शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयं-सहायता गट (SHG), कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपन्या, राज्य सरकार इत्यादींचा समावेश आहे.
आताची सर्वात मोठी बातमी : १ .१ ७ कोटी आधार कार्ड झाले बंद
लाभार्थी गट
- वैयक्तिक उद्योजक
- स्वयं-सहायता गट (SHG)
- शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO)
- शेतकरी सहकारी संस्था
- सामूहिक दायित्व गट (Joint Liability Groups)
- कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत कंपन्या
योजनेंतर्गत मिळणारे फायदे
1) प्रजनन युनिट स्थापनेसाठी सहाय्य — किमान १०० मादी डुक्कर व २५ नर डुक्कर असलेल्या प्रजनन युनिटसाठी एकूण ₹३०.०० लाख रुपयांचे भांडवली अनुदान देण्यात येईल. हे अनुदान दोन समान हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येते.
या जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर , पहा कोणत्या जिल्ह्याना किती रुपये मंजूर झाले ?
2) लहान युनिटसाठी सहाय्य — ५० मादी आणि ५ नर डुक्कर युनिटसाठी उपकंपनीसाठी अनुदान उपलब्ध आहे. या लहान युनिटसाठी एकूण ₹१५ लाख रुपयांपर्यंत भांडवली सहाय्य मिळू शकते.
अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक लाभार्थ्यांनी https://www.udyamimitra.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जाची छाननी आणि निवड प्रक्रियाही याच पोर्टलच्या माध्यमातून पार पाडली जाते.
हा उपक्रम केवळ डुक्कर पालन व्यवसायाचा विकास करण्यापुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, अन्न सुरक्षा आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणारा ठरेल. ज्या उद्योजकांना पशुपालनाच्या माध्यमातून व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना एक मोठी संधी आहे.
नोट — मित्रांनो ही योजना फक्त बीड जिल्ह्यात चालू आहे अधिक माहितीसाठी https://www.zpbeed.gov.in/scheme/वराहपालनाद्वारे-उद्योजक/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
