Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो मे २०२४ तसेच जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागांत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय १६ जुलै २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
मे २०२४ मध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपत्तीमुळे २,७४८ शेतकऱ्यांचे सुमारे ९७६.६७ हेक्टर क्षेत्रातील फळबागा व पिके बाधित झाली होती. या शेतकऱ्यांसाठी शासनाने ४ कोटी ४९ लाख ६ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा होणार ……
सांगली जिल्ह्याला सहा कोटींहून अधिक निधी
जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. १८,३३६ शेतकऱ्यांना या आपत्तीत फटका बसला असून त्यांच्या पुनर्वसनासाठी ६ कोटी २९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा
अहवालानुसार, जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील १,५५१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान सोसावं लागलं. या शेतकऱ्यांना २ कोटी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
जवाहर नवोदय विद्यालय मध्ये या सुविधा मोफत , असा करा अर्ज
मदतीच्या वितरणाची प्रक्रिया
या मदतीचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) पोर्टलद्वारे दिला जाणार आहे. नुकसान भरपाईचे दर १ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये जिरायती, बागायती व फळपिकांसाठी विशिष्ट दरांचा समावेश आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला केवळ तीन हेक्टर क्षेत्रापुरतीच नुकसानभरपाई मंजूर केली जाणार आहे.
या संदर्भातील संपूर्ण शासन निर्णय maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
