Inter-caste marriage scheme : मित्रांनो भारतीय समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेली जातीयतेची बेडी मोडून काढण्यासाठी आणि समाजात समतेची भावना रुजवण्यासाठी केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. त्याच उद्देशाने सुरू करण्यात आलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना 2025 हे सामाजिक एकात्मतेकडे नेणारे ठोस पाऊल आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार,आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होणार?
योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे समाजातील जातीय भेदाभेद दूर करणे आणि विविध जाती-धर्मांतील व्यक्तींमध्ये एकमेकांविषयी समंजसता व स्वीकार निर्माण करणे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन समाजात एकोप्याची भावना रुजवावी, हा या योजनेचा गाभा आहे.
लाभाची रक्कम
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना एकूण ५०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. यातील अर्धा भाग म्हणजे २५,००० रुपये राज्य शासनाकडून आणि उर्वरित २५,००० रुपये केंद्र शासनाकडून दिले जातात.
शेळीपालन योजना : या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार ७५ टक्के अनुदान
योजनेअंतर्गत पात्रता
या योजनेसाठी अर्ज करताना काही अटींचे पालन आवश्यक आहे. विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती ही अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास वर्गातील असणे आवश्यक आहे. दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध किंवा शीख धर्मातील असावी.
अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक जोडप्यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावा. अर्ज स्वच्छ व स्पष्ट अक्षरात भरलेला असावा.
या योजनेसाठी सरकारकडून मिळतंय 6.60 लाख रुपये अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती
अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे
1) विहित नमुन्यातील अर्ज व वर-वधू यांचा एकत्रित लहान फोटो.
2) विवाह नोंदणीचा अधिकृत दाखला.
3) वर आणि वधू यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
4) मागासवर्गीय असल्याचा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा जात प्रमाणपत्र.
5) 15 वर्ष वास्तव्याचा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडील प्रमाणपत्र.
6) स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र (मूळ प्रत) आम्ही या योजनेचा लाभ याआधी घेतलेला नाही आणि आम्ही सुखाने एकत्र राहत आहोत असे नमूद असले पाहिजे.
7) प्रत्येकी दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून शिफारस पत्र (मूळ प्रत).
8) रेशन कार्डाची प्रत (दोघांची नावे असलेली).
9) राष्ट्रीयकृत बँकेतील एकत्रित खाते असलेले पासबुक (छायांकित प्रत).
10) वर व वधू यांचे आधार कार्ड.
अधिक माहिती कोठे मिळेल?
अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता
https://akolazp.gov.in/scheme/आंतरजातीय-विवाह-योजना-2/
ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या समाजातील मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. समतेच्या वाटचालीत अशा योजनांचा प्रभाव फार मोलाचा असतो. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या अटींमध्ये बसत असेल, तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि एक नवे उदाहरण समाजापुढे ठेवा.
