Goat Farming Yojana : मित्रांनो अनुसूचित जमातीतील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही शेळीपालन योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक हवामानात तग धरणाऱ्या उस्मानाबादी, संगमनेरी किंवा इतर स्थानिक जातींच्या १० शेळ्या आणि १ बोकड दिला जातो. हे शेळ्या-बोकडाचे गट तयार करून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते.
या योजनेसाठी सरकारकडून मिळतंय 6.60 लाख रुपये अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती
गटाची किंमत आणि अनुदान
या शेळी गटाची एकूण किंमत ₹१,०३,५४५/- इतकी आहे. त्यामध्ये शासनाकडून ७५ टक्के म्हणजे ₹७७,६५९/- इतके अनुदान दिले जाते. उर्वरित २५ टक्के म्हणजे ₹२५,८८६/- लाभार्थ्यांनी भरायचे असते. ही रक्कम तीन वर्षांच्या विम्यासह असते.
जर लाभार्थीने बँक किंवा वित्तीय संस्थेमार्फत कर्ज घेतले असेल, तर त्याला या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाते. अनुसूचित जातीसाठी विशेष सवलत असून, केवळ ५ टक्के स्वतःचा हिस्सा भरावा लागतो आणि २० टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतली जाऊ शकते.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वार्षिक ₹ 60,000 मिळणार , असा करा अर्ज
योजनेचा लाभ कोणाला?
ही योजना केवळ अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी आहे. ज्यांना शेळीपालन व्यवसाय करून स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत उभारायचा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.
योजनेचे फायदे
1) प्रत्येकी १० शेळ्या आणि १ बोकड यांचा गट मिळतो
2) आर्थिक उत्पन्नासाठी नवे साधन निर्माण होते
3) तिन वर्षांचा विमा संरक्षण मिळते
4) स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होते
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झाले मोठे बदल , जाणून घ्या नवीन दर
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ah.mahabms.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा AH-MAHABMS हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्यावरून अर्ज भरू शकता. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि योग्य ती माहिती भरून फॉर्म सबमिट करा.
