Gharkul Yojana New Updated : नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेसाठी अर्ज केलेल्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता तुमचे नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कारण ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा संगणकावरून सहजपणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अधिकृत वेबसाइट वर जाऊन घरबसल्या तुमची माहिती तपासू शकता.
मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार ९०% अनुदान, असा करा अर्ज
घरकुल यादीत कोणती माहिती मिळते?
घरकुल योजनेच्या यादीत लाभार्थ्याचे नाव, अर्ज क्रमांक आणि कोणत्या प्रवर्गातून प्राधान्य देण्यात आले आहे याची माहिती मिळते. यामुळे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का, हे जाणून घेणे सोपे होते. याशिवाय तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांची स्थिती, त्यांना मिळालेले हप्ते आणि प्रगतीची माहिती देखील याच यादीत दिसते.
घरकुल यादी ऑनलाइन कशी तपासावी?
घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण https://pmaymis.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटवर गेल्यानंतर AwaasSoft या विभागाखाली Report हा पर्याय निवडा. त्यानंतर Beneficiary Details For Verification हा पर्याय निवडल्यावर पुढील माहिती भरावी लागते.
सरकारची खास योजना : दिव्यांगांना दरमहा मिळणार आर्थिक मदत
सुरुवातीला जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा. त्यानंतर वर्ष 2024-25 आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडा. शेवटी स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरून Submit बटन दाबा. काही सेकंदांत तुमच्या गावातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
घरबसल्या अर्जाची स्थिती जाणून घ्या
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही घरबसल्या तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. तुमचे नाव यादीत आहे की नाही, किती हप्ते मंजूर झाले आहेत आणि गावातील इतर कोणाची निवड झाली आहे, याची सविस्तर माहिती ऑनलाइन पाहता येते. त्यामुळे आता शासकीय कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज नाही.
राणी दुर्गावती योजना : या योजनेनुसार मिळणार १००% अनुदान , असा करा अर्ज
Gharkul Yojana List 2025 ही योजना पारदर्शकतेने राबवली जात आहे. लाभार्थ्यांना घरबसल्या माहिती मिळावी यासाठी सरकारने https://pmaymis.gov.in/ ही अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर लगेच वेबसाइटवर जाऊन तुमचे नाव यादीत आहे का ते तपासा आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या.
