Rani Durgawati Yojana : मंडळी महाराष्ट्र शासनाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू केली असून, ही योजना आदिवासी महिलांना 100% सरकारी अनुदानावर विविध व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. याआधी अशा योजनांमध्ये महिलांना 15% आर्थिक भाग स्वतः भरावा लागत होता, मात्र आता तो पूर्णता सरकार उचलणार आहे.
लाडकी बहीण योजनेत दिलासा? ऑगस्ट-सप्टेंबरचे ₹३००० एकत्र जमा होणार का?
योजनेचा उद्देश
शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि स्वयंरोजगार अशा विविध क्षेत्रांमध्ये आदिवासी महिलांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक भार न पडता महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल मिळावे, रोजगार निर्मिती व्हावी आणि आत्मनिर्भरता वाढावी, हे यामागील ध्येय आहे.
लाभ आणि पात्रता
ही योजना फक्त महाराष्ट्रातील स्थायी रहिवासी आदिवासी महिलांसाठी आहे. पात्र महिलांना एकल लाभार्थी स्वरूपात 50,000 रुपयांपर्यंत आणि सामूहिक योजनांमध्ये (महिला बचत गट) साडेसात लाख रुपयांपर्यंत निधी मिळतो. अनुदानातून कपडे विक्री किट, शेळी-म्हैस खरेदी, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर साहित्य, कृषी पंप, भाजीपाला स्टॉल, तसेच मसाला कांडप यंत्र, आटा चक्की, दूध संकलन केंद्र इत्यादी उपक्रम सुरू करता येतात.
बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार १ लाख रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती
अर्ज प्रक्रिया
अर्ज संबंधित जिल्हा आदिवासी विकास विभाग किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून मिळवता येतो. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवास दाखला आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय समिती पात्रता तपासून मंजुरी देते आणि निधी थेट बँक खात्यात जमा केला जातो.
शासनाचा अधिकृत जी.आर.
राणी दुर्गावती योजना नवीन सुरु झालेली आहे. ही योजना कशी राबविली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. मध्ये उपलब्ध आहे.
फ्री सोलर आटा चक्की योजना ! या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
PDF डाउनलोड करा —
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202508071640080824.pdf
प्रेरणास्थान आणि महत्त्व
या योजनेला गोंड वंशातील पराक्रमी राणी दुर्गावतींचे नाव दिले आहे. त्यांच्या शौर्य आणि बलिदानातून प्रेरणा घेऊन महिलांना आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचा मार्ग दाखवण्याचा हा उपक्रम आहे. योजनेमुळे महिलांचे आत्मविश्वास वाढेल, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि समाजात त्यांचे स्थान उंचावेल.
