तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक वापरून Search Beneficiary पर्यायावर क्लिक केल्यास, यादीत तुमचं नाव आहे का, हप्त्यांची स्थिती काय आहे, आणि घराच्या प्रगतीची सविस्तर माहिती तुम्हाला सहज मिळते.
या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना मिळणार २५००० रुपये , असा करा अर्ज
कोण पात्र ठरतो?
या योजनेसाठी अर्ज करताना काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. त्याचे वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान असावे. अर्जदाराकडे पूर्वीपासून पक्के घर नसावे. तसेच, त्याचे नाव बीपीएल यादीत असणे किंवा वैध राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्जासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
अर्ज करताना पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते — आधार कार्ड, पक्कं घर नसल्याचं शपथपत्र, बँक खाते तपशील, आणि वैध ओळखपत्र (जसे की मतदान ओळखपत्र, PAN कार्ड इ.)
2025 मध्ये काय बदल झाले आहेत?
2025 मध्ये सरकारने या योजनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करत 3 कोटी नवीन घरे बांधण्याची घोषणा केली आहे. यात 2 कोटी घरे ग्रामीण भागात आणि 1 कोटी घरे शहरी भागात बांधण्यात येणार आहेत.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून एकाचवेळी मिळणार 18,000 रुपये
या योजनेची अंतिम मुदत आता डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवाय, PMAY 2.0 अंतर्गत मध्यमवर्गीय कुटुंबांनाही लाभ मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे अधिकाधिक कुटुंबांना स्वतःचं घर मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
यादीत नाव असल्यास पुढे काय?
जर तुमचं नाव लाभार्थी यादीत आढळलं, तर पुढील टप्प्यासाठी तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषद किंवा महापालिका कार्यालयात संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे सादर करून पुढील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
जर नाव यादीत नसेल, तरीही निराश होण्याचं कारण नाही. तुम्ही नव्याने अर्ज करू शकता. तसेच अधिकृत संकेतस्थळांवर वेळोवेळी भेट देऊन अपडेट्स पाहणे देखील फायदेशीर ठरेल.
