PM Kisan Yojana 18000 Rupees : मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की आता काही शेतकऱ्यांना एकाचवेळी तब्बल 18,000 रुपयांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते. मात्र ही संधी सर्व शेतकऱ्यांसाठी नसून, केवळ ठरावीक शेतकऱ्यांनाच ही रक्कम मिळणार आहे.
पीएम किसान मानधन योजना : या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹३६,०००
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा?
ज्या शेतकऱ्यांना 11व्या हप्त्यानंतर पीएम किसान योजनेचे पैसे मिळणे बंद झाले होते, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारने अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कागदपत्रांची पडताळणी करण्याची संधी दिली आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांना थेट 12व्या हप्त्यापासून 20व्या हप्त्यापर्यंतची थकबाकी रक्कम म्हणजेच 18,000 रुपये एकाचवेळी मिळणार आहे.
पैसे का थांबले होते?
खरं तर, पीएम किसान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले होते. यामध्ये ई-केवायसी करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे, जमिनीची नोंदणी अपडेट करणे अशा अटी होत्या. या अटी वेळेत पूर्ण न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे हप्ते थांबले. उदाहरणार्थ, 12व्या हप्त्यासाठी जमीन नोंदणी आवश्यक होती, 13व्या हप्त्यापासून आधार आधारित पेमेंट सिस्टम सुरू झाली आणि 15व्या हप्त्यापासून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले. ही कागदपत्रे वेळेवर न सादर केल्याने अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकून पडले.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर , फक्त याच जिल्ह्याना मिळणार अनुदान
आता काय करावे लागेल?
कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, जे शेतकरी आता कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना 18,000 रुपयांची एकरकमी रक्कम मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत pmkisan.gov.in पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करणे, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करणे आणि जमिनीची नोंदणी अपडेट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रेशन कार्डसह इतर आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी करणे देखील गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे थांबले होते त्यांच्यात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने दिलेल्या नव्या संधीमुळे आता त्यांना थकबाकी हप्ते मिळू शकणार आहेत. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे.
