सरकारची मोठी घोषणा : या लोकांना मिळणार मोफत एसटी प्रवास

Free ST Bus : मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा होणार आहे. याशिवाय काही नव्या सवलतीही लागू करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन असून, यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आंतरजातीय विवाह योजना : या योजनेअंतर्गत जोडप्यांना ५०,००० रुपये मिळणार

पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा

सध्या पत्रकारांना एसटीच्या साध्या, निमआराम आणि शिवशाही (आसनी/शयनयान) प्रकारातील बसेसाठी १०० टक्के प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र या सवलतीवर ८,००० किलोमीटरची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे आणि सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करत आहे.

ऑनलाईन आरक्षण सुविधा

१५ ऑगस्ट २०२५ पासून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी एसटी बस प्रवासासाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे पत्रकारांना घरबसल्या प्रवासासाठी जागा आरक्षित करता येणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार,आज ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा होणार?

पत्रकार संघाची बैठक

या संदर्भातील निर्णय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आला. या बैठकीस अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव आणि कार्यकारिणी सदस्य प्रथांत बारसिंग आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रींचा सकारात्मक प्रतिसाद

९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पत्रकार संघाने एसटीच्या सर्व बसेसमधून पत्रकारांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.

राज्य सरकार पत्रकारांच्या प्रवास सवलतीसंबंधी धोरणात लवकरच महत्त्वपूर्ण सुधारणा करणार असून, त्यांना अधिक सुलभ व सन्मानजनक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Leave a Comment