Kanyadan Yojana New Updated : मित्रानो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत कन्यादान योजना राबवली जाते. ही योजना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील कुटुंबांसाठी खास करून सुरू करण्यात आली आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना विवाहासाठी मदत मिळावी आणि त्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पीएम किसान मानधन योजना : या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹३६,०००
कन्यादान योजनेत झालेला बदल
पूर्वी या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना वीस हजार रुपये अनुदान मिळत होते. मात्र शासनाने नवीन निर्णय घेतला असून 30 एप्रिल 2025 पासून हे अनुदान पाच हजार रुपयांनी वाढवण्यात आले आहे. आता प्रत्येक पात्र दांपत्याला पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत. एवढेच नाही, तर अशा सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील प्रोत्साहन म्हणून चार हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?
कन्यादान योजनेमुळे मागासवर्गीय समाजातील गरीब कुटुंबांना विवाहाच्या वेळी येणाऱ्या खर्चात मोठी मदत मिळते. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे लग्नाचे नियोजन करणे कठीण जाते. पण शासनाच्या या मदतीमुळे लग्नाचा खर्च काही प्रमाणात कमी होतो. यामुळे केवळ कुटुंबाचा ताण कमी होत नाही, तर समाजात सामूहिक विवाहामुळे एकोपा आणि सामाजिक समावेश देखील वाढतो.
सरकारतर्फे 100 शेळ्या आणि 5 बोकड घेण्यासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान , आजच करा अर्ज
कोणाला मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. वधू किंवा वर यापैकी एक जरी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असेल तरी तो जोडपे या योजनेसाठी पात्र ठरते. मात्र लग्न सामूहिक स्वरूपात झालेला असावा आणि लाभार्थ्याने इतर कोणत्याही शासनाच्या विवाह योजनेतून मदत घेतलेली नसावी. तसेच वयाची पात्रता आवश्यक असून एका वर्षात फक्त एकदाच हा लाभ मिळू शकतो.
अर्ज कसा करावा?
कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला, वयाचा दाखला, आधार कार्ड, शिधापत्रिका आणि बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे जोडावी लागतात. अर्जाची तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते. निवड झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे जमा केली जाते.
भूतपूर्व सैनिक आणि विधवा महिलांसाठी खास योजना , पहा सविस्तर
कन्यादान योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल घटकांसाठी खूप मोठा आधार ठरत आहे. लग्नासारख्या महत्त्वाच्या सोहळ्यात सरकारकडून मिळणारे पंचवीस हजार रुपये हे गरीब कुटुंबांसाठी मोठी मदत आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ sjsa.maharashtra.gov.in येथे भेट देऊ शकता.
