या महिलांना मिळणार १००% अनुदानावर झेरॉक्स मशीन, असा करा अर्ज

Xerox Machine Yojana : मंडळी समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक उपयुक्त योजना म्हणजे झेरॉक्स मशीन योजना . या योजनेत पात्र महिलांना १००% अनुदानावर झेरॉक्स मशीन मिळते. मशीनची किंमत सुमारे ₹43,070 असून हा संपूर्ण खर्च सरकार उचलते.

Ladki Bahin Yojana: ४२ लाख महिलांचे अर्ज बाद; या कारणांमुळे ऑगस्टचा ₹१५०० हप्ता मिळणार नाही

योजनेचा उद्देश

आजच्या काळात रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत, विशेषता ग्रामीण भागातील महिलांसाठी. झेरॉक्स मशीन व्यवसाय हा कमी भांडवलात सुरू होणारा आणि सतत मागणी असणारा व्यवसाय आहे. या योजनेमुळे बेरोजगार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवता येईल.

योजनेत कोण अर्ज करू शकतात?

ही योजना मुख्यतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि नवबौद्ध या घटकांतील महिलांसाठी आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपर्यंत असावे, तसेच अर्जदार शासकीय सेवेत नसावा आणि यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

प्रधानमंत्री आवास योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

अर्ज कोठे आणि कसा करायचा?

अर्ज आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात सादर करावा लागतो.
सध्या ही योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू आहे, मात्र इतर जिल्ह्यांमध्येही ती लागू होते. प्रत्येक जिल्ह्यात अर्ज करण्याच्या तारखा वेगळ्या असतात, त्यामुळे वेळेवर माहिती घेणे आवश्यक आहे.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

1) ग्रामसेवकांचे जागा संदर्भातील प्रमाणपत्र
2) जातीचे प्रमाणपत्र
3) तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र (₹1 लाख पर्यंत)
4) दारिद्ररेषेखालील प्रमाणपत्र
5) रहिवासी प्रमाणपत्र
6) योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
7) शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र
8) ग्रामसभेच्या ठरावाची प्रत
9) आधार कार्डची प्रत
10) बँक पासबुकची प्रत
11) लाईट कनेक्शन असल्याचा दाखला
12) मालकीच्या जागेचा नमुना क्र. 8अ

पीएम शौचालय योजना : शौचालय बांधण्यासाठी सरकार देतंय 12,000 रुपये

ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा —
झेरॉक्स मशीन योजना अर्ज PDF https://drive.google.com/file/d/1jJ8LChHnvzDQCwd8vSmDTPx4RbJaG409/view?usp=sharing

झेरॉक्स मशीन योजना ही बेरोजगार महिलांसाठी एक मोठी संधी आहे. या योजनेच्या मदतीने केवळ स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो असे नाही, तर आपल्या गावात किंवा परिसरात इतरांना देखील रोजगार देता येतो.
जर तुम्ही पात्र असाल, तर वेळ न घालवता लगेच अर्ज करा आणि स्वावलंबी होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका.

Leave a Comment