विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपये अनुदान मिळणार , असा करा अर्ज

Vihir Anudan Yojana : मंडळी राज्य शासनाच्या वतीने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही योजना अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना विविध कृषी उपयोजनांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

अर्ज प्रक्रिया

या योजनेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन असून, इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbt.maharashtra.gov.in वर आपला अर्ज सादर करावा. अर्ज करताना लाभार्थ्याने पात्रतेची पूर्तता करणे आवश्यक आहे.

गाय म्हैस शेळी साठी मिळणार इतके अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज

उपलब्ध अनुदान

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते.

  • नवीन विहीर खोदकामासाठी चार लाख रुपये
  • जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये
  • शेततळे बांधकामासाठी दोन लाख रुपये
  • वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये
  • ठिंबक सिंचनासाठी छत्तीस हजार रुपये
  • डिझेल पंप खरेदीसाठी चाळीस हजार रुपये
  • पीव्हीसी पाईपसाठी पन्नास हजार रुपये
  • फळबाग लागवडीसाठी पन्नास हजार रुपये

मनरेगा योजनेखाली मिळणार मोफत सायकल ! असा करा ऑनलाईन अर्ज

पात्रता अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

1) अर्जदार अनुसूचित जातीचा असावा.
2) जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
3) विहिरीसाठी किमान ४० गुंठे जमीन असावी.
4) इतर प्रकल्पांसाठी किमान २० गुंठे जमीन आवश्यक आहे.
5) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १.५० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
6) उत्पन्नाचा वैध दाखला आवश्यक आहे.
7) योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील पाच वर्षे पुन्हा अर्ज करता येणार नाही.

कुसुम सोलर पंप योजना : या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 60% अनुदान

आवश्यक कागदपत्रे

  • जातीचा वैध दाखला
  • सातबारा उतारा आणि ८ अ उतारा
  • उत्पन्नाचा प्रमाणपत्र
  • ₹५०,००० किमतीचा बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र
  • तलाठ्याचा दाखला

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. आपण पात्र असाल, तर विलंब न करता महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपला अर्ज ऑनलाइन सादर करावा. ही योजना शेतीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते.

Leave a Comment