PM Mudra Yojana : मंडळी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही केंद्र सरकारने एप्रिल 2015 मध्ये सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज स्वरूपात मदत करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे. या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून हमीशिवाय आणि किमान कागदपत्रांच्या आधारे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
घरकुल लाभार्थ्यांना खुशखबर ! या लाभार्थ्यांना घेता येणार या योजनेचा लाभ
या योजनेचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, या योजनेद्वारे कर्ज घेणाऱ्या चारपैकी सुमारे तीन लाभार्थी महिला आहेत. हे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे एक सकारात्मक उदाहरण आहे.
या योजनेचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत – एक म्हणजे नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणारे कर्ज सहजपणे उपलब्ध करून देणे आणि दुसरे म्हणजे लघु व्यवसायांद्वारे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे. अनेक लोकांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, मात्र त्यांना भांडवलाची अडचण भासते. अशा लोकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना एक चांगला पर्याय ठरतो.
ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतेय 3.15 लाख रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती
या योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी, बँकांकडून लघु उद्योगांसाठी कर्ज घेणे हे खूप कठीण होते. अनेक औपचारिक प्रक्रिया, हमीदारांची आवश्यकता आणि वेळखाऊ कार्यपद्धतीमुळे अनेकांनी कर्ज घेण्याचे टाळले होते. पण प्रधानमंत्री मुद्रा योजनेनंतर ही प्रक्रिया सुलभ झाली आहे आणि नागरिकांना आर्थिक मदतीचा उपयोग करून स्वबळावर व्यवसाय उभारण्याची संधी मिळू लागली आहे.
