मिरची हळद कांडप योजना : या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ₹५०,००० पर्यंत अनुदान

Mirchi Haldi Kandap Yojana : मित्रांनो मसाला प्रक्रिया व्यवसाय ग्रामीण भागात अनेकजण स्वबळावर करत आहेत. विशेषता महिलांमध्ये हा व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती असते, पण योग्य साधनसामग्री आणि आर्थिक मदतीअभावी त्या मागे पडतात. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातीसाठी एक विशेष योजना आणली आहे मिरची हळद कांडप मशीन योजना 2025.

गांडूळखत निर्मिती योजना : शेतकऱ्यांना मिळतंय 75% अनुदान , असा करा अर्ज

ही योजना न्यूक्लिअस बजेट 2025-26 अंतर्गत राबवली जात असून, eligible लाभार्थ्यांना ₹५०,००० पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम मिळवून तुम्ही तुमचा स्वतःचा हळद-मिरची कांडप यंत्र घेऊ शकता आणि घरबसल्या मसाला प्रक्रिया व्यवसाय सुरू करू शकता.

या योजनेचा उद्देश काय आहे?

ग्रामीण आणि आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. महिलांकडे अनेकदा सुकवलेली मिरची, हळद, जिरे यासारखी दाले असतात, पण प्रक्रिया करण्यासाठी मशीन नसल्याने त्या वस्तू कमी दराने विकल्या जातात.
सरकार यामधून महिलांना आणि युवकांना कांडप मशीनसाठी मदत करून त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देत आहे.

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता: आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती!

अनुदान किती आणि कशासाठी?

या योजनेत अर्ज मंजूर झाल्यानंतर ५०,००० रुपये थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातील.
हा निधी मिरची किंवा हळद कांडप मशीन खरेदीसाठी वापरायचा आहे. जर मशीनची किंमत ₹५०,००० पेक्षा जास्त असेल, तर उर्वरित रक्कम लाभार्थीने भरायची.
मात्र जर मशीनची किंमत ₹५०,००० पेक्षा कमी असेल, तर ती पूर्ण रक्कम शासन देईल.

अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?

  • अर्जदार हा अनुसूचित जमातीचा असणे आवश्यक आहे.
  • वय किमान १८ वर्षे असले पाहिजे.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असावा.
  • याआधी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

गॅस सिलिंडर दरात मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) जात प्रमाणपत्र (ST प्रवर्गासाठी)
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) उत्पन्न प्रमाणपत्र
5) बँक पासबुक झेरॉक्स
6) शैक्षणिक कागदपत्रे (जर लागू असतील)
7) मशीन विक्रेत्याचे quotation

अर्ज कसा करायचा?

1) सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला http://www.nbtribal.in भेट द्या.
2) अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून, तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक वगैरे माहिती भरून नोंदणी करा.
3) नोंदणी केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर युजर आयडी व पासवर्ड मिळेल. याचा वापर करून login करा.
4) लॉगिन झाल्यानंतर अर्ज व्यवस्थापन मध्ये जाऊन अर्ज करा वर क्लिक करा.
5) योजना निवडा अनुसूचित जमातीसाठी मिरची हळद कांडप मशीनसाठी अर्थसहाय्य – ₹५०,०००.
6) तुमची माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

मशीन खरेदीसाठी मार्गदर्शन

मशीन खरेदी करताना विश्वासार्ह आणि स्थानिक विक्रेत्यांशी संपर्क साधावा. आधी quotation घ्या, आणि मशीनची गुणवत्ता, हमी आणि सेवा याबाबत माहिती मिळवा. हे quotation अर्जासोबत अपलोड करावे लागते.
जर तुम्हाला अधिक चांगल्या दर्जाचं मशीन हवं असेल, तर थोडं स्वतःचं भांडवल लावून अधिक गुणवत्तापूर्ण मशीनही घेऊ शकता. मशीन घेतल्यानंतर त्याचं बिल व्यवस्थित जपून ठेवा ते अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ठरते.

दलालांपासून सावध राहा

ही योजना सरकारी आहे, त्यामुळे कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. काही लोक अर्ज करून देतो म्हणून पैसे मागतात, पण या प्रक्रियेसाठी कोणताही शुल्क लागणार नाही. तुमच्या परिसरातील आदिवासी प्रकल्प कार्यालयात जाऊन अधिकृत मार्गदर्शन घ्या.

योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवात १५ जुलै २०२५ पासून झाली असून, नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र व्यक्तींनी लवकरात लवकर अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.

मिरची हळद कांडप मशीन योजना 2025 ही अनुसूचित जमातीच्या महिला आणि युवकांसाठी एक उत्तम आर्थिक संधी आहे. ही योजना फक्त आर्थिक मदत देत नाही, तर स्वावलंबन, सशक्तीकरण आणि उद्योजकतेची दिशा देखील देते.
जर तुम्ही पात्र असाल, तर वेळ वाया न घालवता आजच अर्ज करा.

Leave a Comment