Lakhpati Didi Yojana : नमस्कार मित्रांनो भारत सरकारकडून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी योजना 2025. या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून सरकारकडून एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज दिले जाते. ही योजना केवळ आर्थिक मदत न देता, महिलांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात , असा भरा फॉर्म
लखपती दीदी योजना नेमकी काय आहे?
या योजनेची सुरुवात २३ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये महिला बचत गटांशी (Self Help Groups – SHG) संलग्न महिलांना व्यवसायासाठी भांडवली मदत दिली जाते. सरकारने २०२५ पर्यंत या योजनेचा विस्तार ३ कोटी महिलांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
योजनेचे फायदे
- एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळते.
- महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
- उद्योजकता, शेती, पशुपालन, व्यवसाय व्यवस्थापन आदींचे प्रशिक्षण दिले जाते.
- डिजिटल व्यवहार, बँकिंग प्रणाली, मोबाइल वॉलेट यासंबंधी मार्गदर्शन केले जाते.
- महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवून दिला जातो.
- विविध मंत्रालये व संस्थांच्या सहकार्याने एकात्मिक लाभ मिळवून देता येतो.
रेन गन खरेदीसाठी मिळत आहे 42,500 रुपये , असा करा अर्ज
पात्रता कोणासाठी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पात्रता म्हणून लागू आहेत.
- अर्ज करणारी महिला भारतीय नागरिक असावी.
- तिचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे.
- महिला बचत गटाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (असल्यास), बँक खात्याची माहिती, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक
या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना मिळणार २५००० रुपये , असा करा अर्ज
अर्ज करण्याची प्रक्रिया
१) अधिकृत संकेतस्थळ https://lakhpatididi.gov.in ला भेट द्या.
२) नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा.
३) नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल व OTP वापरून खाते तयार करा.
४) लॉगिन करून अर्जाचा फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
५) अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर, अधिकृत यंत्रणा पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधतील.
लखपती दीदी योजना 2025 ही ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी एक उत्तम संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त केले आहे.
