शेळी पालनासाठी मिळतंय 90% अनुदान , असा करा ऑनलाईन अर्ज

Goat Farming Yojana : मंडळी महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. ही शेती मुख्यता पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाचे लहरी स्वरूप लक्षात घेता, काही वेळा चांगले उत्पादन मिळते, तर काही वेळा दुष्काळामुळे नापिकीचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतीव्यतिरिक्त दुसऱ्या उत्पन्नाच्या स्रोतांची नितांत गरज आहे.

अहिल्या शेळी पालन योजना – एक आर्थिक आधार

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अहिल्या शेळी पालन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि महिलांना शेळीपालनासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते. यामुळे शेतीसोबतच एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग खुला होतो.

लाडकी बहीण योजना : 1500 रुपये तुम्हाला मिळाले का ? असे चेक करा लगेच

योजनेअंतर्गत मिळणारी मदत

या योजनेत पात्र लाभार्थ्यांना उस्मानाबादी किंवा संगमनेरी शिवा या प्रजातींमधील १० शेळ्या आणि १ बोकड दिला जातो. हे प्राणी स्थानिक हवामानासाठी योग्य असून त्यांच्यापासून दूध, शेळीचे मांस आणि पैदास या माध्यमांतून उत्पन्न मिळवता येते.

अनुदान रचना

या योजनेत एकूण खर्चावर ९० टक्के शासकीय अनुदान दिले जाते. त्यातील ३० टक्के राज्य शासनाकडून आणि ६० टक्के केंद्र शासनाकडून दिले जाते. उर्वरित १० टक्के खर्च लाभार्थ्याने करावा लागतो. यामध्ये शेळ्यांचा विमा (₹४२००) आणि इतर व्यवस्थापन खर्च (₹५८००) यांचाही समावेश आहे.

या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये मिळणार

अर्जदारासाठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • तो अल्पभूधारक शेतकरी असावा (१ ते २ एकरपेक्षा जास्त जमीन नसावी).
  • अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
  • लाभार्थीने मागील ३ वर्षांत इतर कोणत्याही पशुपालन/शेती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसावा.

महिलांना विशेष प्राधान्य

या योजनेत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. एका घरातील फक्त एक महिला अर्ज करू शकते. अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना यामध्ये अग्रक्रमाने निवडले जाते.

रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली , लगेच पहा तारीख

अर्ज प्रक्रिया आणि अधिक माहिती

या योजनेसाठी अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयात करता येतो. योजनेची सविस्तर माहिती आणि अनुदान यादी पाहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी https://ahd.maharashtra.gov.in/en/sgr-stall

अहिल्या शेळी पालन योजना ही एक उपयुक्त योजना असून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पूरक व्यवसायाची संधी देते. शासनाचे प्रयत्न हे आहेत की ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकरी आणि महिला या योजनेचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात.

Leave a Comment