कुकुटपालन योजना : या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून 75% अनुदान मिळणार

Kukut Palan Yojana Anudan : मित्रांनो आज बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न ठरला आहे. विशेषता ग्रामीण भागातील तरुण, जे शेतीवर अवलंबून आहेत किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतरही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे कुक्कुट पालन योजना 2025.

महाराष्ट्र सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत ही योजना सुरू केली असून, राज्यातील युवकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या दिशेने वळवण्यासाठी हा एक मोठा पाऊल आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मिळेल कर्ज , कसा करावा अर्ज ?

या योजनेतून काय मिळणार आहे?

कुक्कुट पालन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून 75% अनुदान मिळते. उर्वरित 25% रक्कम लाभार्थ्याने भरायची असते. उदाहरणार्थ, एक प्रकल्प जर सुमारे 1,40,000 रुपयांचा असेल, तर त्यात 1,06,000 रुपयांपर्यंतचे अनुदान सरकारकडून मिळू शकते.

कमी गुंतवणुकीत आपण स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो, हे या योजनेचं विशेष वैशिष्ट्य आहे. विशेषतः ज्यांना गावाकडं राहूनच उत्पन्नाचा स्रोत हवा आहे, अशांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

डुक्करपालन व्यवसायासाठी मिळतंय ३ ० लाख रुपये अनुदान , असा करा अर्ज

कोंबड्यांच्या कोणत्या प्रजाती मिळणार आहेत?

ही योजना केवळ एका प्रजातीपुरती मर्यादित नाही. यामध्ये वनराज, गिरीराज, कडकनाथ, ब्लॅक, अ‍ॅस्ट्रॉलॉप, आय.आय.आर., पोटरी आणि बॉयलर अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. तुम्हाला जर कोणत्याही प्रजातीबद्दल माहिती असेल, तर तुम्ही त्यावर विशेष भर देऊन व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने वाढवू शकता.

आजच्या काळात गावरान कोंबडीची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारात स्थान मिळवणंही तुलनेनं सोपं आहे.

कोण पात्र आहेत?

कुक्कुट पालन योजनेसाठी काही अटी आणि पात्रता निकष आहेत. सर्वप्रथम, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. योजनेचा लाभ राज्याबाहेरील कोणालाही मिळणार नाही.

आता वर्षातून 2 वेळा मोफत गॅस सिलिंडर मिळणार , जाणून घ्या सविस्तर

अर्ज केल्यानंतर किमान तीस ते चाळीस दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या योजनेचा लाभ घेतल्यावर पुढील पाच वर्षांपर्यंत पुन्हा अर्ज करता येत नाही. व्यवसायासाठी पुरेशी जागा असणे, पिल्लांचं संगोपन योग्य पद्धतीने करणं, लसीकरण करणं हे सर्व लाभार्थ्याचं जबाबदारीचं काम असतं.

याशिवाय मागासवर्गीय, अल्पभूधारक, भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील अर्जदारांना विशेष प्राधान्य दिलं जातं.

आवश्यक कागदपत्रांची यादी

1) आधार कार्ड
2)रहिवासी दाखला
3) 7/12 आणि 8 अ उतारा (जमीन असल्यास)
4) जातीचा दाखला (असल्यास)
5) दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र (असल्यास)
6) पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
7) बँक पासबुक
8) चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
9) राशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

कुक्कुट पालन योजनेसाठी अर्ज ही प्रक्रिया सध्या ऑफलाइन पद्धतीनेच राबवली जाते. त्यासाठी सर्वप्रथम वरील कागदपत्रांची पूर्तता करून घ्या. मग आपल्या तालुक्यातील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात जाऊन योजनेची चौकशी करा. तिथून अर्ज मिळवून तो व्यवस्थित भरावा व संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावा.

अर्ज करताना आपल्याला काही शंका असल्यास विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्या. हे सगळं करताना काळजीपूर्वक आणि योग्य नियोजनासह पुढे जा.

सरकारचा हेतू काय आहे?

या योजनेमागचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातील युवकांना शेतीपूरक व्यवसायाकडे वळवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. यामुळे बेरोजगारी कमी होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नागरिकांना स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग मिळेल.

खरंतर अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते, पण आर्थिक मदतीअभावी ते पावलं पुढं टाकू शकत नाहीत. ही योजना अशा लोकांसाठी एक आशेचा किरण आहे.

Leave a Comment