Ads

घरकुल योजना : घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा आपले नाव

Gharkul Yojana New List Declared : मंडळी आपलं स्वतःचं घर असावं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची स्वप्नवत अपेक्षा असते. विशेषता ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी हे स्वप्न अजूनही दूर वाटतं. भारत सरकारने हीच गरज ओळखून 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) सुरू केली. आता 2025 मध्ये, या योजनेने नव्या उंचीला गाठत अनेक कुटुंबांना घरकुलाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी दिली आहे.

योजना कशासाठी आहे?

पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, तिचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू, बेघर व झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना सन्मानाने राहता येईल असे पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात , असा भरा फॉर्म

2025 मध्ये या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याची यादी जाहीर झाली आहे. लाखो कुटुंबांना आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, आणि सरकारकडून योजनेचा विस्तारही सुरू आहे.

योजना कशी राबवली जाते?

ही योजना दोन मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे ग्रामीण भागासाठी PMAY-G आणि शहरी भागासाठी PMAY-U. या दोन्ही योजनेत घरबांधणीसाठी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते.

ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना 1.20 लाख रुपये तर डोंगराळ किंवा दुर्गम भागात राहणाऱ्यांना 1.30 लाख रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. ही रक्कम तीन टप्प्यांत मिळते घर बांधणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांनुसार हप्त्यांच्या स्वरूपात.

रेन गन खरेदीसाठी मिळत आहे 42,500 रुपये , असा करा अर्ज

शहरी भागात, घर बांधण्यासाठी कर्ज घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा अल्प उत्पन्न गटातील (EWS/LIG) लाभार्थ्यांना 6 लाखांपर्यंतच्या कर्जावर 6.5 टक्के व्याजदराने सबसिडी दिली जाते.

यादीत नाव कसे शोधावे?

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर यादीत तुमचं नाव आहे का हे शोधणं खूप सोपं आहे.

ग्रामीण भागासाठी अधिकृत संकेतस्थळ pmayg.nic.in आणि शहरी भागासाठी pmaymis.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी.

घरकुल यादीत नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment