Savitribai Phule Swadhar Yojana : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबवते. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025. ही योजना विशेषता ओबीसी प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आहे. शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांना अन्न, वसतिगृह, भाडे किंवा इतर शैक्षणिक खर्च परवडत नाही. या अडचणींवर मात करण्यासाठी सरकार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी थेट ₹60,000 पर्यंतची आर्थिक मदत जमा करते.
या योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार दरमहा ५००० रुपये , असा करा अर्ज
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देणे. घरापासून दूर राहून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह किंवा राहण्याची सोय करावी लागते. अनेक वेळा हा खर्च परवडत नाही आणि शिक्षण अपूर्ण राहते. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडू नये म्हणून ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना विद्यार्थ्यांना राहण्याच्या ठिकाणानुसार वेगवेगळी मदत देते. जर विद्यार्थी मुंबई, पुणे किंवा इतर महानगरांमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला दरवर्षी ₹60,000 मिळतात. महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ₹51,000 तर जिल्हा आणि तालुका मुख्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹43,000 मिळतात. या रकमेचा उपयोग विद्यार्थी अन्न, निवास आणि इतर शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी करू शकतात.
आयुष्यमान कार्ड योजना : असे करा डाउनलोड मोबाईलवरून
पात्रता निकष
या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातील असावा आणि जात प्रमाणपत्र सादर करावे लागते. पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे. जर विद्यार्थी अनाथ असेल तर महिला व बालकल्याण विभागाकडून प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच, अपंग विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे गरजेचे आहे, जेणेकरून मदत थेट खात्यात जमा होऊ शकेल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना काही कागदपत्रे जोडावी लागतात. त्यामध्ये आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, दहावी आणि बारावीची गुणपत्रके, शाळा किंवा महाविद्यालयातील प्रवेशाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक यांचा समावेश होतो.
भांडी वाटप योजनेसाठी असा करा अर्ज , लगेच पहा सविस्तर माहिती
अर्ज प्रक्रिया
विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 साठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात. अर्जासाठी अधिकृत वेबसाइट म्हणजे mahadbt.maharashtra.gov.in. विद्यार्थी या पोर्टलवर लॉगिन करून अर्ज भरू शकतात किंवा जवळच्या समाजकल्याण कार्यालयात जाऊनही अर्ज करता येतो. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते आणि पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजना आहे. दरवर्षी मिळणारी साठ हजार रुपयांची मदत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी मोठा आधार देते. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण केवळ पैशाअभावी थांबणार नाही. जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज करून शिक्षणातील आर्थिक अडचणींवर मात करा.
