शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पोकरा २.० योजना सुरु झाली , पहा सविस्तर माहिती

Pocra Yojana : शेतकरी मित्रांनो ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण अखेर आला आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प – टप्पा २ अर्थात पोकरा २.० योजना अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ही योजना २०२५–२६ या आर्थिक वर्षापासून पुढील सहा वर्षांपर्यंत राज्यात अंमलात राहणार आहे.

हवामान बदलांचा सामना करण्यासाठी ठोस उपाय

राज्यातील हवामानातील बदलांमुळे शेतीवर होणारे परिणाम सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादनक्षमता यांना बळकटी देण्यासाठी पोकरा २.० ही योजना प्रभावी ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यापैकी सत्तर टक्के निधी म्हणजेच चार हजार दोनशे कोटी रुपये जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळणार असून, उर्वरित तीस टक्के म्हणजेच अठराशे कोटी रुपये राज्य शासनाकडून खर्च करण्यात येणार आहेत.

महिला आणि बालकल्याण योजना – ग्रामीण भागातील महिलांसाठी सशक्तीकरणाची दिशा

योजनेंतर्गत समाविष्ट जिल्हे

पोकरा २.० योजनेत महाराष्ट्रातील एकूण एकवीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आहेत. हे जिल्हे म्हणजे – बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अमरावती, अकोला, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद), परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर.

लाभार्थी पात्रता आणि सहभाग

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. पाच हेक्टरपर्यंत शेती असलेल्या जमीनधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील. तसेच शेतकरी गट, स्वयंसहाय्यता गट तसेच एफपीओ (Farmer Producer Organizations) देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. विशेष बाब म्हणजे हवामान अनुकूल बियाणे उत्पादन घटकासाठी जमिनीची मर्यादा लागू होणार नाही, त्यामुळे अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

जिल्हा परिषद २०% सेस फंडांतर्गत विद्यार्थिनींसाठी सायकल, महिलांना शिलाई मशीन मिळणार

अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक तयारी

पोकरा २.० योजनेची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यासाठी फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे अद्याप फार्मर आयडी नाही, त्यांनी तो लवकरात लवकर तयार करावा. या योजनेसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. अर्ज, नोंदणी व लाभ वितरणाची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबवली जाणार असल्यामुळे पारदर्शकता आणि गती या दोन्ही बाबींना प्राधान्य दिले जाणार आहे.

या योजनेची वाट अनेक शेतकरी बांधव गेल्या कित्येक महिन्यांपासून पाहत होते. आता ही योजना सुरू झाल्यामुळे त्यांनी तातडीने आपले फार्मर आयडी तयार करावेत आणि अर्ज प्रक्रियेची अधिकृत घोषणा झाल्यानंतर लागलीच अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांना mahapocra.gov.in किंवा krishi.maharashtra.gov.in नियमित भेट देत राहा. मित्रांनो ही माहिती आवडल्यास इतरा शेतकरी मित्रांबरोबर नक्की पाठवा.

Leave a Comment