national biogas vikas yojana : नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊया राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेबद्दल जी केंद्र सरकारकडून बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी अनुदान मिळवून देते. ग्रामीण भागात स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि सेंद्रिय खताचा उपयोग वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेअंतर्गत अनुदानाची माहिती
या योजनेत बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. सर्वसाधारण गटासाठी एक घन मीटर क्षमतेच्या संयंत्रासाठी नऊ हजार आठशे रुपये मिळतात, तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी ही रक्कम सतरा हजार रुपये आहे.
आताची सर्वात मोठी बातमी : १ .१ ७ कोटी आधार कार्ड झाले बंद
दोन ते चार घन मीटर क्षमतेसाठी अनुदान चौदा हजार तीनशे पन्नास रुपये आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी बावीस हजार रुपये आहे. पाच ते सात घन मीटर क्षमतेच्या संयंत्रासाठी सर्वसाधारण गटासाठी बावीस हजार सातशे पन्नास रुपये आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात. शिवाय, प्रत्येक संयंत्राला शौचालय जोडणी केल्यास अतिरिक्त 1600 रुपयांचे अनुदान दिले जाते.
लाभार्थी कोण आहेत ?
ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी असून अनुसूचित जाती आणि जमातींसाठी विशेष सवलती उपलब्ध आहेत. बायोगॅस संयंत्र उभारण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीने याचा लाभ घेऊ शकतो.
या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये मिळणार
फायदे
या योजनेमुळे बायोगॅससारखे स्वच्छ इंधन घराघरात उपलब्ध होते. यामुळे इंधनावर होणारा खर्च कमी होतो, पर्यावरणाचे रक्षण होते आणि शेतीसाठी सेंद्रिय खताची निर्मिती होते. शिवाय ग्रामीण स्वच्छतेतही वाढ होते.
अर्ज कसा करावा ?
अर्ज करण्यासाठी तुम्ही संबंधित विभागाशी संपर्क साधावा. जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी आणि तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याकडे संपर्क साधल्यास अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती मिळेल. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर तपासणी झाल्यावर अनुदान मंजूर केले जाते.
रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत वाढली , लगेच पहा तारीख
नोट — अर्ज प्रक्रिया व अधिक माहितीसाठी आजच अधिकृत वेबसाईट https://akolazp.gov.in/scheme/राष्ट्रीय-बायोगॅस-विकास/ ला भेट द्या
