गांडूळखत निर्मिती योजना : शेतकऱ्यांना मिळतंय 75% अनुदान , असा करा अर्ज

Gandulkhat Yojana : मित्रांनो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, जमिनीची सुपिकता टिकून राहावी आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर व्हावा या उद्देशाने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत गांडूळखत उत्पादन युनिट, नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट तसेच सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

विद्यार्थ्यांना मिळतंय 86 प्रकाराचे शैक्षणिक कर्ज , असा करा लगेच अर्ज

प्रकल्पाचा उद्देश

या योजनेचा मुख्य उद्देश जमिनीची उर्वरता वाढवणे, पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिक घटकांचा वापर करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. रासायनिक खतांचा अतिवापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे ध्येय आहे.

कोण लाभ घेऊ शकतात?

या प्रकल्पाचा लाभ प्रामुख्याने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळतो. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग शेतकरी तसेच सर्वसाधारण शेतकरी देखील अर्ज करू शकतात. मात्र संबंधित गावातील ग्राम कृषि संजीवनी समिती (VCRMC) कडून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

गॅस सिलिंडर दरात मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना शेतकऱ्यांनी ७/१२ व ८-अ उतारा, जातीचा दाखला (जर लागू असेल तर), विधवा किंवा परित्यक्ता असल्याचे प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे.

अर्थसहाय्य किती मिळते?

या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या युनिटसाठी सरकारकडून ठराविक प्रमाणात अनुदान दिले जाते. गांडूळखत उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामध्ये ० ते २ हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ७५ टक्के म्हणजेच साडेसात हजार रुपये अनुदान मिळते, तर २ ते ५ हेक्टर क्षेत्रासाठी ६५ टक्के म्हणजेच सहा हजार पाचशे रुपये अनुदान मिळते. नाडेप कंपोस्ट युनिटसाठी दहा हजार रुपयांपैकी साडेसात हजार रुपये अनुदान दिले जाते. सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिटसाठी सहा हजार रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असून, त्यात ० ते २ हेक्टर क्षेत्रासाठी चार हजार पाचशे रुपये आणि २ ते ५ हेक्टर क्षेत्रासाठी तीन हजार एकशे रुपये अनुदान मिळते.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेती निगडीत वस्तू झाल्या स्वस्त , पहा सविस्तर

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?

अधिक माहिती हवी असल्यास शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, समूह सहाय्यक किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment