Fisheries Yojana : मंडळी यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तब्बल १०७ टक्के पर्जन्यमानामुळे आपल्या परिसरातील नद्या, नाले भरून वाहत आहेत. अनेक शेततळ्यांमध्ये भरपूर पाणी साठले आहे. हेच पाणी फक्त सिंचनासाठी वापरण्याऐवजी आता उत्पन्नवाढीच्या संधीसाठीही वापरता येईल त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे शेततळ्यातील मत्स्यपालन.
आज शेती करणे हे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत शेतीपूरक व्यवसाय हा उत्पन्न वाढवण्याचा एक महत्वाचा मार्ग ठरतो. त्यापैकी मत्स्यपालन हा व्यवसाय कमी खर्चात आणि अल्प जागेतही करता येणारा, परंतु चांगले आर्थिक लाभ देणारा आहे.
मुलींच्या लग्नासाठी मिळणार ५१,००० रुपयांची रक्कम, असा करा ऑनलाईन अर्ज
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा (पोकरा) पुढाकार
राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळ्यातील गोड्या पाण्यात मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मत्स्यपालनासाठी लागणाऱ्या खर्चावर अनुदान दिले जाते.
जर तुमच्याकडे ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असेल आणि शेततळ्यात पुरेसे पाणी साठलेले असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
योजनेअंतर्गत अत्यल्प भूधारकांना एकूण खर्चाच्या ७५ टक्के आणि अल्प भूधारकांना ६५ टक्के अनुदान मिळू शकते. म्हणजेच शेतकऱ्याच्या वाट्याला येणारा खर्च खूपच कमी होतो आणि नफा मिळवण्याची संधी वाढते.
वृद्ध नागरिकांना मिळणार दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत, असा करा अर्ज
अनुदानासाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. अर्ज करण्यासाठी https://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते.
अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रं आवश्यक आहेत.
- ७/१२ आणि ८-अ उतारा (जमीन ५ हेक्टरपर्यंत असावी)
- जातीचा पुरावा (जर अनुसूचित जाती किंवा जमातीतील असल्यास)
- विधवा किंवा परित्यक्ता असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
ही सर्व कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करावीत. अर्ज करताना अडचण आल्यास स्थानिक कृषि विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत.
सोन्याच्या दरात झाली घसघशीत वाढ , पहा आजचे सोन्याचे दर
जास्त माहिती कुठून मिळेल?
तुमच्या भागातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेबाबत अधिक माहिती मिळवता येईल. हे अधिकारी तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया, मत्स्यपालनासाठी आवश्यक बाबी आणि त्यातील तांत्रिक मार्गदर्शनही देतील.
शेततळ्यांमध्ये असलेले पाणी जर उपयोगात आणले नाही, तर ते वाया जाते. पण त्याच पाण्यात जर मासे सोडले, तर काही महिन्यांत तुम्हाला उत्पन्न मिळवता येईल. कमी जागेत, कमी गुंतवणुकीतून सुरू होणारा हा व्यवसाय शेतीसोबत सहज सांभाळता येतो. शिवाय बाजारपेठेत गोड्या पाण्यातील माशांना कायम मागणी असते.
आज बदलत्या शेतीच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा योजना खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळे याचा विचार जरूर करा आणि गरज वाटल्यास आपल्या भागातील कृषि विभागाशी संपर्क साधा.
