गॅस सिलेंडर वर मिळणार ३०० रुपयांचे अनुदान , लवकर पहा सविस्तर माहिती

Gas Cylinder Anudan : नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे देशातील जवळपास १०.३३ कोटी कुटुंबांना थेट फायदा होणार आहे.

SBI पशुपालन कर्ज योजना : 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार , असा करा अर्ज

योजनेचा प्रवास आणि उद्दिष्ट

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मे २०१६ मध्ये सुरू झाली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील प्रौढ महिलांना कोणतेही सुरक्षा पैसे न भरता एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे. गॅस सिलिंडरमुळे धूरमुक्त स्वयंपाकघर, महिलांच्या आरोग्याचे संरक्षण आणि पर्यावरणासाठी मदत असा या योजनेचा एकूण फायदा आहे.

आतापर्यंतचा लाभ

या वर्षी १ ऑगस्टपर्यंत देशभरात १०.३३ कोटी एलपीजी कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसपैकी सुमारे ६० टक्के गॅस भारत आयात करतो, त्यामुळे ही सबसिडी आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरते.

थेट कर्ज योजना : व्यवसाय करण्यासाठी लाभार्थ्यांना मिळणार १ लाख रुपयांचे कर्ज

नव्या अनुदानाचा तपशील

अधिकृत माहितीनुसार, २०२५-२६ या वर्षात लाभार्थ्यांना दरवर्षी ९ गॅस सिलिंडरवर प्रति सिलिंडर ३०० रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे. या योजनेसाठी सरकारकडून एकूण अंदाजे १२ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ pmuy.gov.in येथे भेट द्या.

Leave a Comment