Milk Business : नमस्कार मित्रांनो शेतीसोबत दुग्धव्यवसाय हा अनेक शेतकऱ्यांचा उपजीविकेचा महत्वाचा आधार आहे. दुभत्या जनावरांची काळजी घेणे आणि दुधाचे उत्पादन योग्य प्रकारे हाताळणे यासाठी काही उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरतात. ही उपकरणे आर्थिकदृष्ट्या सर्व शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने शासनाने या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज , असा करा ऑनलाईन अर्ज
नोंदणीकृत तबेला परवानाधारक शेतकऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे, जेणेकरून ते गायी-म्हशींसाठी रबर मॅट, दूध काढण्याचे यंत्र (Milking Machine) आणि कडबाकुट्टी यंत्र (Chaff Cutter) खरेदी करू शकतील. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक भारात मोठी घट करत आहे.
कोण लाभ घेऊ शकतो?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी ठरवण्यात आल्या आहेत. अर्जदाराकडे नोंदणीकृत तबेल्याचा अधिकृत परवाना असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे किमान पाच किंवा त्यापेक्षा जास्त दुभती जनावरे असावी लागतात. अशा शेतकऱ्यांना ही योजना लागू होते.
लाडकी बहीण योजना : महिलांच्या खात्यात ₹ ३००० जमा होणार , नवीन यादी जाहीर
किती टक्के अनुदान मिळते?
या योजनेअंतर्गत दूध काढण्याचे यंत्र आणि रबर मॅटसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते. यामुळे आधुनिक पद्धतीने दूध प्रक्रिया करता येते, जनावरांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते, आणि उत्पादनात वाढ होण्यासही मदत होते. कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी देखील अनुदानाची तरतूद आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग किंवा जवळच्या पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा. तिथे अर्जाची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.
या विद्यार्थ्यांना मिळणार १ लाख रुपये शिष्यवृत्ती, असा करा अर्ज
अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास, आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग किंवा जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच zpthaneschemes.com या अधिकृत संकेतस्थळला भेट देऊ शकता.
