Lek Ladki Yojana Updated : मित्रांनो महाराष्ट्र शासनाने गरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण सुरू राहावे आणि त्यांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ही योजना खास करून 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आली असून यामध्ये मुलगी जन्मल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते.
लाडकी बहीण योजना : महिलांच्या खात्यात ₹ ३००० जमा होणार , नवीन यादी जाहीर
लेक लाडकी योजनेत मिळणारी मदत
या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर एकूण 1,01,000 रुपयांची मदत मिळते. मुलीच्या जन्मावेळी 5,000 रुपये दिले जातात. पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6,000 रुपये, सहावीत गेल्यावर पुन्हा 6,000 रुपये आणि अकरावीत प्रवेश घेतल्यावर 8,000 रुपये मिळतात. शेवटी मुलगी 18 वर्षांची पूर्ण झाल्यावर तिच्या नावावर 75,000 रुपये जमा होतात. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या विवाहासाठी वापरता येते.
योजनेचा उद्देश
लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आणि गरीब कुटुंबांवरील लग्नाचा खर्च किंवा शिक्षणाचा ताण कमी करणे हा आहे. या योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेणे सोपे होते तसेच पालकांना मुलीच्या भविष्याची काळजी कमी होते.
या विद्यार्थ्यांना मिळणार १ लाख रुपये शिष्यवृत्ती, असा करा अर्ज
कोणाला मिळतो योजनेचा लाभ?
ही योजना केवळ गरीब कुटुंबांसाठी आहे. याचा लाभ घेण्यासाठी मुलगी 2023 नंतर जन्मलेली असावी. कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा कमी असावे. महत्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ एका कुटुंबातील केवळ दोन मुलींना मिळतो, मात्र जुळ्या मुली असल्यास अपवाद केला जातो.
अर्ज करण्याची प्रक्रिया
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयातून, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयातून मिळतो. अर्ज भरताना मुलीचा जन्म दाखला, आधार कार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो अशी आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाते.
सोलर कुंपण योजना : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान
अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी— womenchild.maharashtra.gov.in
लेक लाडकी योजनेचे फायदे
लेक लाडकी योजना गरीब कुटुंबातील मुलींसाठी मोठा आधार आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी निधीची कमतरता राहत नाही. पालकांना मुलींच्या शिक्षणाबरोबरच विवाहासाठीही आर्थिक मदत मिळते. यामुळे समाजात मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होते.
