या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन , असा करा ऑनलाईन अर्ज

Shilai Machine Application Online : नमस्कार मित्रांनो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे मार्फत व्यवसायाभिमुख वस्तू पुरवठा योजना राबवली जाते. या योजनेचा उद्देश महिलांना स्व-उद्योजक बनवून त्यांचे उत्पन्नवाढीस मदत करणे हा आहे.

ही योजना खास करून ग्रामीण आणि शहरी भागातील, विशेषता स्वयं-सहाय्यता गटांमध्ये कार्यरत महिलांसाठी आहे. महिलांनी शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, घरघंटी यांसारख्या व्यवसायोपयोगी वस्तू खरेदी केल्यानंतर, त्यावर शासनाकडून प्रत्यक्ष खर्चाच्या 90% पर्यंत अनुदान दिले जाते.

लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी झाली जाहीर; तुमचं नाव यादीत आहे का? असं करा चेक!

योजनेमागील उद्दिष्ट

या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे आणि त्यांना उत्पन्नाचे स्थिर साधन मिळवून देणे. शासकीय पाठबळाच्या माध्यमातून महिलांना कौशल्यावर आधारित उद्योगात उतरायला मदत करणे, हीसुद्धा यामागची भूमिका आहे.

कोण पात्र आहे?

1) अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
2) महिला बचत गटाची सदस्य असल्यास अर्जास प्राधान्य दिले जाईल.
3) उत्पन्न मर्यादा ही संबंधित विभागाने निश्चित केलेली असते.
4) लाभार्थीने यापूर्वी ही योजना घेतलेली नसावी.

या महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी , असा करा अर्ज

कोणता लाभ मिळतो?

महिलांनी शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, घरघंटी इत्यादी उपकरणे खरेदी केल्यास, त्या वस्तूंवरील खर्चाच्या 90% इतकी रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाते. उर्वरित 10% रक्कम लाभार्थीने भरायची असते. हे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केलं जातं.

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागतो. त्यासाठी खालील वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागते. https://zpthaneschemes.com/1/pgeUserRegistration.aspx नोंदणी करताना महिलांनी आपली वैयक्तिक माहिती, बँक तपशील, खरेदी केलेल्या वस्तूंचे मूळ बिल इत्यादी माहिती भरावी लागते. अर्ज सबमिट केल्यानंतर पंचायत समितीकडून अर्जाची छाननी केली जाते आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा केला जातो.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, असा करा अर्ज

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) बँक पासबुक (IFSC कोडसह)
3) खरेदी केलेल्या वस्तूंचे मूळ बिल
4) शाळा किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र (लागल्यास)
5) महिला बचत गटाची सदस्यता प्रमाणपत्र (लागल्यास)

अर्जांची छाननी व मंजुरी

सर्व अर्ज पंचायत समितीच्या कार्यालयात तपासले जातात. पात्र ठरलेल्या महिलांची यादी तयार केली जाते आणि अंतिम मंजुरीनंतर निधी थेट त्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास संबंधित पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाशी किंवा स्थानिक महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

Leave a Comment