Pradhan Mantri Awas Yojana Gramin : मंडळी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी केंद्र सरकारकडून एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana – Gramin) अंतर्गत राज्याला मिळालेल्या उद्दिष्टात मोठी वाढ करण्यात आली असून तब्बल ३३ लाख ४० हजारांहून अधिक घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
शेततळ्यातील मत्स्यपालन योजनेसाठी असा करा अर्ज , जाणून घ्या सविस्तर माहिती
घरकुलांच्या उद्दिष्टात मोठी वाढ
केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या तुलनेत या वाढीमुळे जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजना मिळू शकेल. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेकांना घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.
आवास प्लस सर्वेक्षणाची मुदत वाढवली
घरकुल मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड आवास प्लस प्रणालीतून केली जाते. यासाठी लाभार्थ्यांनी स्वतःहून सर्वेक्षण करणे आवश्यक असते. याच सर्वेक्षणाची अंतिम तारीख पूर्वी ३१ मे २०२५ होती, परंतु आता ती वाढवून १८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे अनेक नवीन अर्जदारांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे आणि आधी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी मिळण्याचा वेग वाढला आहे.
बेरोजगार युवक-युवतींसाठी कुकुटपालन योजने अंतर्गत अनुदान सुरु , असा करा अर्ज
लाभार्थी यादी आता ऑनलाइन उपलब्ध
३० मे २०२५ रोजी केंद्र सरकारने नव्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. ही यादी आता नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर सहज पाहता येते. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणच्या अधिकृत पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध आहे.
नागरिकांनी यादी पाहण्यासाठी pmayg.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटवरील Awaassoft Reports या पर्यायामध्ये गावनिहाय यादी तपासता येते. येथे लाभार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, प्रवर्ग आणि प्राधान्यक्रम याची माहिती मिळते. याशिवाय ही यादी PDF किंवा Excel स्वरूपात डाउनलोड करण्याचीही सुविधा दिली आहे.
पॅन कार्ड वर मिळणार 5 लाखांचं कर्ज , असा करा ऑनलाईन अर्ज
नागरिकांना होणारा फायदा
घरकुल योजनेतील सर्व प्रक्रिया आता पारदर्शक आणि सुलभ करण्यात आल्या आहेत. अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी यादी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायत किंवा शासकीय कार्यालयात न जाता थेट मोबाईलवरच माहिती मिळू शकते. जर यादीत तुमचे नाव असेल, तर पुढील प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतशी संपर्क साधून घरकुलाच्या बांधकामाची मंजुरी घेता येते.
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राला मिळालेल्या तब्बल ३३ लाखांहून अधिक घरकुलांच्या मंजुरीमुळे राज्यातील लाखो कुटुंबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आपले स्वतःचे घर मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे.
