या शेतकऱ्यांना मिळेल मोफत वीज , या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

Krushi Pump Mofat Veej : नमस्कार मित्रांनो राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जात आहेत. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी पंप मोफत वीज योजना लागू केली असून, यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. गुरुवारी याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला (महावितरण) सुरुवातीला १,९६९ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. याशिवाय, उर्वरित ३,७१६ कोटी रुपयांची तरतूद २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून महायुती सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजना : 1500 रुपये तुम्हाला मिळाले का ? असे चेक करा लगेच

योजनेचे स्वरूप

महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेती पंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ ४४ लाख ३ हजार शेती पंप ग्राहकांना मिळणार आहे. या योजनेंतर्गत एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ या कालावधीत एकूण १४,७६० कोटी रुपये अनुदानासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तीन वर्षांनंतर या योजनेचा आढावा घेऊन सुधारणा करण्यात येणार आहे.

शासनाचा ठाम निर्धार

महाविकास आघाडीने महायुती सरकारवर वारंवार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला होता. पण कृषी पंप मोफत वीज योजना लागू करून सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ही योजना केवळ घोषणेत न थांबता, प्रत्यक्षात राबवली जाईल, यासाठीही महावितरणला आवश्यक निधी देण्यात येत असल्याचा शासन निर्णयात स्पष्ट उल्लेख आहे.

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना : या योजनेसाठी तुम्हाला मिळणार अनुदान , असा करा अर्ज

निधीचे वितरण

२०२४-२५ साठी अर्थसंकल्पीय तरतूदीतील ५,६८५ कोटींपैकी १,९६९ कोटी रुपये महावितरणला तातडीने वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या योजनेची सुरुवात गतीने होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.

महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी वर्ग आनंदीत असून, हा निर्णय त्यांच्या भवितव्यासाठी लाभदायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Leave a Comment