एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध Autobiography of Soldier Essay in Marathi

Autobiography of Soldier Essay in Marathi: माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ एक उपचार म्हणून ‘हुतात्मा दिन’ साजरा केलात. काही जणांनी तेही केले नाही. माझ्या देशबांधवांनो, तुम्ही एवढे निष्ठुर कसे बरे झालात? अरे, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आत्मबलिदान केले, आपल्या सर्वस्वाची आहुती दिली त्यांची साधी आठवणही तुम्हांला राहू नये?

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Autobiography of Soldier Essay in Marathi

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध Autobiography of Soldier Essay in Marathi

आमच्या वेळी स्वार्थ अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते, मिळवण्याच्या एकाच ध्येयाने ! ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ अशी सर्वांची बेभान अवस्था झाली होती. हे ‘सतीचे वाण’ आम्ही स्वत:हूनच खुशीने स्वीकारले होते. या संग्रामात आमच्यापुढे वाढून ठेवलेल्या सर्व दु:खांची, संकटांची आम्हांला पूर्ण कल्पना होती. तरीपण आम्ही न डगमगता या अग्निपथावरून हसतमुखाने आणि वज्रनिर्धाराने ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली.

देशभक्तीचे हे व्रत लोकमान्यांनी आम्हांला दिले होते. या व्रताची साधना कशी करावी, हे पूज्य बापूजींनी आम्हांला शिकवले होते. सत्य-अहिंसेच्या शस्त्रहीन अमोघ साधनांनी आम्ही परकीय सत्तेशी झुंजलो. क्रूर इंग्रज सरकारने आमच्यावर गोळ्यांच्या फैरी झाडल्या, तरी आम्ही आमच्या ध्येयापासून जराही विचलित न होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्या. महात्माजींनी दिलेल्या ‘चले जाव’च्या आदेशाने परकीय सत्ता पार हादरली. सारा देश पेटून उठला. सर्वजण स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने उतरले. इंग्रज सरकार तर अगदी पिसाळले होते; पण प्राणांची बाजी लावणाऱ्या देशभक्तांपुढे सरकारचे काहीच चालले नाही. ज्या दिवशी ‘स्वातंत्र्य’ मिळाले त्या दिवशी सर्वांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. लवकरच स्वराज्याचे सुराज्य होणार, असे स्वप्न सर्वजण उरी बाळगून होते. पण…

“आता स्वातंत्र्य मिळून साठहून अधिक वर्षांनंतरही ते स्वप्न अपुरेच राहिले आहे. सत्तास्पर्धेमुळे आणि स्वार्थापायी आज देशनिष्ठा, प्रामाणिकपणा हे गुण मातीमोल ठरले आहेत. सर्वत्र भ्रष्टाचाराचा भस्मासुर मातला आहे. हे पाहून आम्हां देशभक्तांचे, हुतात्म्यांचे अंत:करण विदीर्ण झाले आहे. माझ्या देशबांधवांनो, माझी कळकळीची प्रार्थना ऐका मायभूमीच्या सेवेची शपथ घ्या. या तुमच्या सेवासाधनेतून आमच्या स्वप्नातील ‘सुराज्य’ या भरतभूमीवर जेव्हा अवतरेल, तेव्हाच आम्हां हुतात्म्यांना खरी शांती लाभेल.”

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!