मी पृथ्वी बोलत आहे! मराठी निबंध Autobiography of Mother Earth Essay in Marathi

Autobiography of Mother Earth Essay in Marathi: मामाच्या गावी गेलो की, डोंगरावर भटकायला मला खूप आवडते. एकदा असाच भटकत माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी गेलो. वडाचे झाड… विस्तृत पसरलेले… चहुबाजूंना पारंब्या… थंडगार सावली ! मी जमिनीवर झोकून दिले. कितीतरी वेळ मी उताणा पहुडलो होतो. वर अफाट आभाळ पसरले होते. मनात येऊ लागले… काय असेल हे आभाळ म्हणजे? कसे असेल ते? हे झाड, ही माती, हे लहानमोठे दगड, हा डोंगर… कोठून आले हे सगळे ? ही आपली पृथ्वी कशी निर्माण झाली असेल? ही आपली पृथ्वी व तिच्यासारखे काही ग्रह सूर्याभोवती फिरतात. असे अब्जावधी सूर्य मिळून एक आकाशगंगा बनते ! अशा अब्जावधी आकाशगंगा मिळून एक महाआकाशगंगा बनते ! अशा अब्जावधी महाआकाशगंगा मिळून… बापरे ! या संपूर्ण विचारचक्राने डोळ्यावर झापडच येऊ लागली.

मी पृथ्वी बोलत आहे! मराठी निबंध Autobiography of Mother Earth Essay in Marathi

मी पृथ्वी बोलत आहे! मराठी निबंध Autobiography of Mother Earth Essay in Marathi

इतक्यात जमिनीतून आवाज येऊ लागला… “अरे बाळा, मी पृथ्वी बोलत आहे! मी पृथ्वी. तुमची धरित्री, धरणी, अवनी, वसुधा, वसुंधरा… ! किती नावे दिली आहेत तुम्ही मला! आता तू विचार करत होतास ना, तो मला कळला ! म्हटले, तुला थोडी माहिती दयावी; तुझ्या ज्ञानात थोडी भर घालावी; म्हणून तुझ्याशी बोलायला मी आले आहे.

तुला मी माझी संपूर्ण जीवनकहाणी सांगून कंटाळा आणणार नाही, बरं, का ! तरीपण… तुला ठाऊक आहे का माझे वय काय?… नाही ना? मग ऐक तर. थोडी थोडकी नव्हेत, तब्बल ५०० कोटी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. सुरुवातीला मी तप्त वायूंचा एक गोळा होते. हळूहळू वायू थंड होत गेले आणि मला भरीव आकार येत गेला. कालांतराने येथे पाणी निर्माण झाले. पाण्यामुळे हळूहळू सजीवांची निर्मिती झाली. एकामागून दुसरा, दुसऱ्यामागून तिसरा… असं होता होता सर्वांचं जीवन एकमेकांशी घट्टपणे बांधल गेलं. सर्व सजीवांच्या जीवन जाळ्याला निर्जीव वस्तूही जोडल्या गेल्या. हे सर्व इतकं एकरूप झालं आहे की, या सृष्टीतला एक घटक जरी नष्ट झाला, तर दुसऱ्याच्या जगण्यावर परिणाम होणार ! नुसती कल्पना करून बघ बघू. सगळी वनस्पतिसृष्टी एकाएकी अदृश्य झाली, तर काय होईल ? तर… तर… शाकाहारी प्राणी भुकेने तडफडून मरून जातील. बरोबर? मग मांसाहारी प्राण्यांचे काय? जे माणसाप्रमाणेमांसाहार व शाकाहार दोन्ही करतात, त्यांचे काय? सर्व प्राणी एकमेकांना खावून सपवून टाकतील, नाही का? असं घडलं तर संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट होईल !

हे तुला मी का सांगत आहे, माहीत आहे ? माणसानेच आज ही सर्वनाशाची पाळी आणली आहे. बुद्धीच्या जोरावर रोगराईवर मात करून माणसाने आपलं आयुष्य वाढवलं मृत्यूचं प्रमाण कमी केलं. साहजिकच लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येची सोय करण्यासाठी बेसुमार जंगलतोड सुरू झाली. वनस्पती नष्ट होण्यामुळे तिच्यावर अवलंबून असणारे प्राणीही नष्ट होऊ लागले आहेत. सजीवांच्या साखळीतील एकेक प्राणी नष्ट होत आहे. त्याचे गंभीर परिणाम सर्व सजीवांना भोगावे लागत आहेत. माणूस आधुनिक जीवनशैली निर्माण करण्याच्या नादात निसर्गापासून दूर गेला. जल प्रदूषण, वायुप्रदूषण, भूप्रदूषण अशा प्रदूषणांमुळे माणसाने निसर्गावर अनन्वित अत्याचार सुरू केले आहेत. मी हे सारे हतबल होऊन पाहत बसले आहे. सुमारे दोनशे लाख वर्षांपूर्वी माणसाची उत्पत्ती झाली. तो माणूस स्वत:च हळूहळू स्वतःच्याच नाशाच्या दिशेने चालला आहे. माणसाला वाचवायचे असेल, तर त्याने पृथ्वीवर, म्हणजेच माझ्यावर जे अत्याचार चालवले आहेत, ते ताबडतोब थांबवले पाहिजेत.

“तू पोहोचवशील माझा हा संदेश सर्व माणसांपर्यंत?” जमीन किंचितशी थरथरली आणि मला जाग आली. त्या स्वप्नातील प्रसंगाने अजूनही मी अस्वस्थ झालेलो आहे.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!