शेडनेट हाऊस योजना , सरकार देतंय लाखो रुपयांचे अनुदान , असा करा अर्ज

Shadenet House Yojana : मंडळी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेडनेट हाऊस उभारणीसाठी शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिले जाते. शेडनेट हाऊस म्हणजेच पिकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेली अशी संरचना ज्यामुळे वातावरणातील बदल, उष्णता, थंडी, कीड आणि रोगांचा पिकांवर होणारा परिणाम कमी होतो. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि बाजारभाव चांगला मिळण्याची संधी वाढते.

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता: आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती!

शेडनेट हाऊससाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी काही कागदपत्रांची जोड करणे आवश्यक आहे. यात ७/१२ उतारा आणि ८ अ नमुना, अर्जदाराचे आधार कार्ड, आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, हमीपत्र तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी संवर्ग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

आकारमान आणि अनुदानाची रचना

शेडनेट हाऊस उभारण्यासाठी शासनाने निश्चित केलेले आकारमान, प्रकल्प खर्च आणि अनुदान वेगवेगळे आहेत. १००८ चौ.मी. आकारमानाच्या शेडनेट हाऊससाठी प्रकल्प खर्च प्रति चौ.मी. ७४२ रुपये इतका आहे, परंतु त्यापैकी ७१० रुपये प्रति चौ.मी. शासनाकडून ग्राह्य धरले जातात. उर्वरित ३४ रुपये प्रति चौ.मी. शेतकऱ्याला स्वतःच्या खर्चाने भागवावे लागतात.

गॅस सिलिंडर दरात मोठे बदल , जाणून घ्या आजचे नवीन दर

या आकारमानासाठी जास्तीत जास्त ३,५५,००० रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध आहे. याशिवाय २०४८ चौ.मी., ३०४० चौ.मी. आणि ४००० चौ.मी. या वेगवेगळ्या आकारमानांसाठी अनुक्रमे ७,१०,००० रुपये, १०,६५,००० रुपये आणि १४,२०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते.

अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेती निगडीत वस्तू झाल्या स्वस्त , पहा सविस्तर

अधिक माहितीसाठी संपर्क

शेतकऱ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. हे अधिकारी अर्ज प्रक्रियेपासून अनुदानाच्या सर्व टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.

शेडनेट हाऊसचे फायदे

शेडनेट हाऊस उभारणीमुळे शेतकऱ्यांना हवामान बदलांचा पिकांवर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येतो. पिकांना योग्य वातावरण मिळाल्याने त्यांची वाढ चांगली होते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. ही योजना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोठी मदत ठरत आहे.

Leave a Comment