Gas Cylinder Rate Changes : नमस्कार मित्रांनो व्यावसायिक वापरासाठी लागणारा १९ किलो वजनाचा एलपीजी सिलेंडर आता स्वस्त झाला आहे. त्याच्या किमतीत तब्बल ५१ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, याआधी ऑगस्ट महिन्यातही अशाच प्रकारे व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती.
मत्स्यपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार ९०% अनुदान, असा करा अर्ज
मोठ्या शहरांतील नवे दर
नवीन दर जाहीर झाल्यानंतर मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १,५३१ रुपये ५० पैशांना मिळतोय. दिल्लीत हा दर १,५८० रुपये झाला आहे. कोलकात्यामध्ये सिलेंडर १,३३४ रुपये ५० पैशांना मिळणार असून चेन्नईमध्ये हा दर १,७३८ रुपये इतका आहे. त्यामुळे विविध शहरांमधील व्यावसायिकांना या कपातीचा थेट फायदा होणार आहे.
घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही
व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती वापरासाठी लागणाऱ्या १४ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. मुंबईत हा सिलेंडर ८५२ रुपये ५० पैशांना उपलब्ध आहे. दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या शहरांतही घरगुती गॅस सिलेंडर याच दराने मिळत आहे.
बायोगॅस संयंत्रसाठी मिळतंय अनुदान , लगेच करा असा अर्ज
दर ठरवण्याची प्रक्रिया
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करतात. सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात झाल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना आर्थिक सुटकेचा श्वास घेता आला आहे.
