पॅक हाऊस अनुदान योजना : पॅक हाउस उभारणीसाठी मिळणार ४०% अनुदान

Pack House Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची मेहनत आणि कष्टाने उगवलेले फळपिके जर योग्य वेळी आणि चांगल्या स्थितीत बाजारात पोहोचली, तर त्याची किंमत अधिक मिळते आणि कष्टाचे खरे चीज होते. मात्र नाशवंत फळपिके – जसे की द्राक्षे, आंबे, डाळिंब, पेरू – योग्य पॅकिंग व साठवण न केल्यास लवकर खराब होतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हाच विचार करून महाराष्ट्र शासनाने एकात्मिक फळोत्पादन विकास अभियानांतर्गत पॅक हाउस योजना सुरू केली आहे.

लाडकी बहीण योजनेत दिलासा? ऑगस्ट-सप्टेंबरचे ₹३००० एकत्र जमा होणार का?

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या नाशवंत फळांचे आयुष्य वाढवणे. पॅक हाउसच्या मदतीने फळांचे संकलन, वर्गीकरण, धुलाई आणि पॅकिंग करता येते. योग्य पॅकिंगमुळे उत्पादनाचा दर्जा टिकून राहतो, त्याचे सादरीकरण आकर्षक होते आणि बाजारात चांगली किंमत मिळते.

ही योजना वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गट किंवा संघटनांसाठी खुली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये ७/१२ आणि ८अ उताऱ्याची प्रत, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत, हमीपत्र तसेच जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) यांचा समावेश आहे.

घरकुल यादी : आपल्या गावाची घरकुल यादी पहा मोबाईल वर

शासन पॅक हाउस उभारणीसाठी ४०% अनुदान देते. उदाहरणार्थ, जर प्रकल्पाचा एकूण खर्च ₹४,००,००० असेल, तर शेतकऱ्याला ₹२,००,००० इतकी रक्कम अनुदान स्वरूपात मिळते. उर्वरित रक्कम शेतकऱ्याने स्वतःकडून भागवायची असते, पण पॅक हाउसचा उपयोग केल्याने हा खर्च लवकर परत मिळवता येतो.

असा करा ऑनलाईन अर्ज

अर्ज प्रक्रिया सुरू असून इच्छुक शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

असे करा जन्म प्रमाणपत्र घरबसल्या डाउनलोड ! जाणून घ्या सविस्तर माहिती

पॅक हाउस ही सुविधा केवळ फळांचे आयुष्य वाढवण्यासाठीच नव्हे, तर त्यांचा दर्जा टिकवून विक्रीतून चांगला नफा मिळवण्यासाठी एक खात्रीशीर पायरी आहे. आजच्या स्पर्धात्मक बाजारात, उत्पादनाच्या गुणवत्तेला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी हे एक उत्तम साधन ठरू शकते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस मोठा हातभार लावू शकते.

Leave a Comment