Farmer Agriculture Scheme : मंडळी शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी काही नव्या योजना जाहीर केल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महामारी, दुष्काळ आणि विविध साथीच्या रोगांमुळे अनेकांना पशुधनाची मोठी हानी सोसावी लागली. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन या योजनांची आखणी करण्यात आली आहे, ज्यामुळे नुकसानग्रस्त पशुपालकांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिना घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर ;लगेच पहा तुमचे नाव यादीत आहे का ?
विविध योजनांची घोषणा
या योजनांमध्ये जिल्हा परिषद उपकर योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेतून वैयक्तिक लाभाच्या योजना समाविष्ट आहेत. विशेषता आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत. पात्र लाभार्थींसाठी अर्ज करण्याची मुदत २३ सप्टेंबरपासून २२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करून संधीचा फायदा घ्यावा.
योजनेतील महत्त्वाचे लाभ
1) ७५ टक्के अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड देण्यात येणार आहे.
2) दूध काढण्यासाठी आवश्यक असलेल्या मिल्किंग मशीनसाठी ५० टक्के अनुदान दिले जाईल.
3) मुरघास (सायलेज) निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सायलेज बॅगवर ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
4) खनिज मिश्रण वापरणाऱ्या दुधाळ जनावरांसाठी, कमाल दोन जनावरांपर्यंत ३३ टक्के अनुदानाची तरतूद आहे.
या योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार दरमहा ५००० रुपये , असा करा अर्ज
अर्जाची प्रक्रिया कशी करावी?
या योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. याशिवाय जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.zpsolapur.gov.in/ सविस्तर माहिती व अर्ज उपलब्ध आहेत.
अधिकाधिक लाभार्थ्यांनी पुढे यावे
पशुपालक, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळशिरस तालुका पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
