Fundkar Falbag Lagwad Yojana : मंडळी शेतीतील उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आणि शाश्वत शेतीचा मार्ग खुला करण्यासाठी राज्य शासनाने स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. अनेक शेतकरी असे असतात की जे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत. अशा शेतकऱ्यांना फलोत्पादनाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
कोण करू शकतो या योजनेचा लाभ?
ही योजना त्या वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी आहे, जे रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र नाहीत. अर्जदाराच्या नावावर स्वतःची शेती असणे आवश्यक आहे आणि ते ७/१२ उताऱ्याद्वारे सिद्ध व्हावे. जर ७/१२ उपलब्ध नसेल, तर समंतीपत्राद्वारेही अर्ज करता येतो.
अरे व्हा ! दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी मिळणार आर्थिक मदत
किती क्षेत्रासाठी मिळतो लाभ?
शेतकरी या योजनेचा लाभ किमान ०.२० हेक्टर पासून कमाल ६.०० हेक्टर क्षेत्रासाठी घेऊ शकतो. इच्छेनुसार एकापेक्षा अधिक फळपिकांची लागवड करता येते. विशेष बाब म्हणजे, जर शेतकऱ्याने रोजगार हमी योजनेतून २ हेक्टरपर्यंत लाभ घेतलेला असेल, तर उर्वरित क्षेत्रासाठी या नव्या योजनेचा लाभ घेता येतो. पूर्वीच्या योजना अंतर्गत घेतलेला लाभ गृहित धरून त्याव्यतिरिक्त क्षेत्रासाठी योजनेत सहभाग घेता येतो.
कोणती फळपिके करता येतील?
या योजनेत राज्य शासनाने १६ बहुवार्षिक फळपिकांचा समावेश केला आहे. यामध्ये आंबा, पेरू, मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, चिकू यांसारख्या आर्थिक दृष्ट्या फायदेशीर फळपिकांचा समावेश आहे.
दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी स्कुटी खरेदीसाठी मिळतेय अनुदान , असा करा अर्ज
शासनाकडून मिळणारे अनुदान
शासन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देते. त्यामध्ये खड्डे खोदणे, रोपांची लागवड, पीक संरक्षणाची व्यवस्था, नांग्या भरणे आणि ठिबक सिंचनासारख्या कामांचा समावेश होतो. ही मदत फक्त आर्थिकच नाही, तर उत्पादन टिकवून ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहे.
अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in. या अधिकृत पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा आणि आवश्यक ती माहिती भरून अर्ज सादर करावा.
नमो शेतकरी योजनेचा ७ वा हप्ता या तारखेला होणार जमा , पहा सविस्तर
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) ७/१२ उतारा
2) नमुना ८ अ
3) आधार कार्ड
4) बँक पासबुकची झेरॉक्स
अधिक माहितीसाठी कोठे संपर्क करावा?
अर्ज भरण्यापूर्वी किंवा त्यानंतर जर काही शंका असतील, तर तालुक्याचे कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किंवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते योग्य मार्गदर्शन देतील.
ही योजना फक्त अनुदानापुरती मर्यादित न राहता, फळबाग लागवडीसारख्या दीर्घकालीन उत्पन्नाच्या पर्यायासाठी एक उत्तम संधी आहे. बदलत्या हवामानात आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी ही संधी ओळखून फळबाग लागवडीकडे वळावे.
