अरे व्हा ! दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी मिळणार आर्थिक मदत

Divyang Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत विशेष योजना राबवली जाते. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचे आयुष्य अधिक सक्षम व स्वावलंबी करणे.

पीएम किसान योजना : या तारखेला मिळणार पीएम किसानचा २१ वा हप्ता

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी व कागदपत्रांची आवश्यकता असते. सर्वप्रथम अर्जदाराने जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अस्थिव्यंग किमान चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त, कर्णबधिर साठ डेसिबलपेक्षा जास्त, तसेच अंध व्यक्तींची दृष्टी तीक्ष्णता 20/200 किंवा 6/60 असणे गरजेचे आहे. मानसिक दिव्यांगत्वाच्या बाबतीत आयक्यू सत्तरपेक्षा कमी असल्यास त्याची नोंद पुरावा म्हणून दिली जावी. या प्रकरणात पालकांचे हमीपत्र आवश्यक नसते.

ऑनलाईन पद्धतीने सातबारा उताऱ्यात करा नोंदणी , जाणून घ्या सविस्तर माहिती

योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाह करणारे दोन्ही लाभार्थी दिव्यांग असणे बंधनकारक आहे. याशिवाय विवाह नोंदणी दाखला, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि आयएफएससी कोड देणे आवश्यक आहे. संबंधित खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. आर्थिक पात्रतेसाठी लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील यादीत असल्यास त्याचा दाखला जोडावा किंवा वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र द्यावे. तसेच लाभार्थी स्थानिक रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा सरपंचांकडून घ्यावे.

अर्ज प्रक्रिया आणि निवड पद्धती

अर्जदाराने आपला अर्ज ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या शिफारशीसह समाजकल्याण विभागाकडे सादर करावा. अर्जांची अंतिम निवड करण्याचा अधिकार समाजकल्याण समितीकडे असतो. प्राप्त प्रस्तावांमधून लाभार्थ्यांची निवड ठराव समितीच्या सभेत केली जाते. निवड झाल्यानंतर मंजूर अनुदान जिल्हा परिषदेमार्फत वितरीत केले जाते आणि गट स्तरावरून थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केले जाते.

नवीन राशन कार्ड काढण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

योजनेची मर्यादा आणि लाभ

ही योजना उपलब्ध निधीनुसारच राबवली जाते. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना वैवाहिक जीवनासाठी आर्थिक आधार मिळतो, त्यांचे स्वावलंबन वाढते आणि समाजात सन्मानाने जगण्यासाठी मदत होते.

अधिक माहिती कुठे मिळेल?

या योजनेबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी zpthaneschemes.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment