PM Mudra Loan Scheme : नमस्कार मित्रांनो भारत सरकारने नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या कर्ज मर्यादेत लक्षणीय वाढ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आता 20 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध आहे. यापूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये होती. यामुळे देशातील लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील, आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
अर्थ मंत्रालयाचे मत
या निर्णयामुळे मुद्रा योजनेचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल. छोटे व्यावसायिक आणि उद्योजक आपले व्यवसाय विस्तारू शकतील, ज्यामुळे देशातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये मिळणार
मुद्रा लोन योजना: योजना समजून घ्या
प्रधानमंत्री मुद्रा योजना बेरोजगार तरुणांसाठी विशेषता उपयोगी ठरली आहे. या योजनेद्वारे इच्छुक तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आता सरकारने कर्ज मर्यादा 50,000 रुपये ते 20 लाख रुपये पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे अधिकाधिक तरुणांना व्यवसायात उतरता येईल.
पीएम मुद्रा कर्जाचे प्रकार
या योजनेत लाभार्थ्यांसाठी तीन प्रकारचे कर्ज उपलब्ध आहे.
1) शिशु कर्ज: 50,000 रुपये पर्यंत
2) किशोर कर्ज : 50,000 ते 5 लाख रुपये
3) तरुण कर्ज : 5 लाख ते 20 लाख रुपये
या शेतकऱ्यांना मिळेल मोफत वीज , या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
पात्रता
प्रधानमंत्री मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत.
1) अर्जदार भारतीय नागरिक असावा.
2) वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
3) अर्जदाराने बँकेकडून कर्ज मिळण्यास अपात्र घोषित होऊ नये.
4) व्यवसायाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक.
5) आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, व्यवसायाशी संबंधित प्रमाणपत्रे इत्यादी बरोबर ठेवावी.
मुलगी असेल तर मिळणार 10,000 रुपये , असा करा अर्ज
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
मुद्रा लोनसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील पद्धती अवलंबा.
1) अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
2) तुमच्या कर्जाच्या प्रकारानुसार (शिशु, किशोर, तरुण) पर्याय निवडा.
3) अर्जाचा PDF डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्या.
4) आवश्यक माहिती भरा आणि सर्व कागदपत्रे जोडून जवळच्या बँक शाखेत जमा करा.
5) अर्जाची पडताळणी झाल्यानंतर काही दिवसांत कर्जाची रक्कम खात्यात जमा होईल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना लघु उद्योजकांना व्यवसायाच्या विकासासाठी संधी देते. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर या योजनेचा लाभ घ्या आणि रोजगार निर्मितीत हातभार लावा.
टीप: अधिक माहितीसाठी जवळच्या बँकेत संपर्क साधा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
