Tractor Yojana : शेतकरी मित्रांनो सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते, ज्यांचा उद्देश शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा असतो. त्यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
शेतीचे उत्पादन वाढवणे, मेहनत आणि वेळ वाचवणे, तसेच शेतकऱ्यांना आधुनिक साधनांनी सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
लाडकी बहीण योजना : या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही , लगेच यादीत आपले नाव चेक करा
या योजनेत शेतकऱ्यांना ३.१५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. एकूण खर्चाच्या ९० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. हे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात.
अर्ज करण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या महाडीबीटी (MAHADBT) या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
लागणारी कागदपत्रे
अर्ज करताना काही कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स आणि आयकर प्रमाणपत्र (लागू असल्यास) यांचा समावेश होतो.
सोलर कुंपण योजना : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान
पात्रता निकष
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करावा लागतो.
ही योजना लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांमुळे शेतीच्या कामात सुलभता येते आणि उत्पादनक्षमता वाढते.
